शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Shanivar 2022: श्रावण शनिवारी 'अशी' करा पिंपळाची आणि मारुती रायाची पूजा; होतील अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:38 IST

Shravan Shanivar 2022: हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. हे व्रत केले असता असे अनेक लाभ होतात.

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थमारुतीची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. गीतेमध्ये भगवंताने 'अश्वत्थ सर्ववृक्षाणाम' म्हणजे वृक्षांमध्ये जो अश्वत्थ आहे, तो मी आहे, असे म्हटले आहे. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध ग्रंथात याबद्दल सविस्तर माहिती मिळते.

अनेक जण चातुर्मासात रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असे म्हणतात. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढेही ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अश्वत्थपूजेला मान असे. यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची कथा पद्मपुराणात आढळते. 

एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रगटले. त्यांनी धनंजयाला `तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मला जखमा झाल्या आहेत' असे सांगितले. 

हे ऐकून दु:खी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो रोज भक्तीने अश्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. अशी अश्वत्थ पूजेची महती आहे.

हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या, हे सर्वपरिचित आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते, त्यांनी निदान शनिवारी, विशेषत: श्रावणी शनिवारी अश्वत्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालाव्यात. तसे करणे केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक ठरते. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल