शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Guruwar 2023: इच्छित फलप्राप्तीसाठी चार श्रावणी गुरुवार करा 'या' दत्तमंत्रांचा जप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 07:00 IST

Shravan Guruwar 2023: श्रावणात शिवपुजेला महत्त्व असले तरी श्रावण गुरुवारी शिव उपासनेला दत्त उपासनेची जोड दिल्यास अधिक पुण्य मिळते. 

श्रावणातल्या गुरुवारी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. परंतु गुरुचरित्र वाचताना कडक पथ्ये पाळावयाची असल्याने अलीकडच्या काळात अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पठण करता येत नाही. त्यावर उपाय म्हणून गुरुचरित्रसार या ग्रंथात दत्तउपासनेसाठी काही मंत्र दिले आहेत. श्रावणी गुरुवारपासून या मंत्रांचा नित्यनेमाने जप करावा. मनोभावे केलेल्या या उपासनेचे फळ निश्चित मिळू शकेल.

दत्तगुरु हे स्मर्तृगामी आहेत.. अर्थात स्मरण करता क्षणी मदतीला येणारे आहेत. अशा दत्त गुरूंना शरण जाऊन आपल्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली असता ते नक्कीच मदतीला येतात असा भक्तांचा अनुभव आहे. मात्र त्यासाठी आपलीही उपासना आणि विश्वास दृढ असला पाहिजे. भगवंताच्या नामाप्रती प्रेम वाटले पाहिजे. यासाठी नामस्मरणाचा उपाय दिला आहे. ते सातत्याने केले असता नामावर प्रेम जडते आणि प्रेमाने भगवंताला आपलेसे करता येते असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात. चला तर या श्रावणातल्या गुरुवारी दत्तगुरुंप्रती आपणही सेवा भाव रुजू करूया आणि दिलेल्या मंत्रांचा पुनरुच्चार करूया व उपासनेस प्रारंभ करूया. 

इष्ट फलप्राप्तीसाठी'दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा' या मंत्राचा संकल्पपुर्वक १०८ वेळा जप करावा.

विद्याभ्यासात प्रगतीसाठी'ऊँ दत्ताय साक्षात्काराय नम:' या मंत्राचा रोज अभ्यासापूर्वी १० वेळा जप करावा.

संकटाचे निवारण होण्यासाठीअनसूयाऽत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर:, स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् - या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

दारिद्रयाचे निवारण होऊन सांपत्तिक परिस्थिती सुधारावी म्हणूनदद्रिविप्रगेहे य: शाकंभुक्तवोत्तमश्रियम् , ददौ श्रीदत्तदेव: स, दारिद्रयाच्छ्रीप्रदोऽवतु - या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

सौभाग्यवृद्धीसाठीजीवायामास भर्तारं, मृतं सत्या हि मृत्युहा, मृत्युंजय: स योगीन्द्र: सौभाग्यं मे प्रयच्छतु - या मंत्राचा विवाहित स्त्रियांनी १०८ वेळा नित्य जप करावा.

संततीप्राप्तीसाठीदूरीकृत्य पिशाचार्ति जीवयित्वा मृतं सुत् , योऽभूदभीष्टद: सिद्ध: स न: संततिवृद्धिकृत् - हा मंत्र पती व पत्नीने नित्य श्रद्धेने १०८ वेळा जप करावा. दोघांपैकी एकाने हा मंत्र म्हटला आणि दुसऱ्याने श्रवण केला तरी चालेल.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल