शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेद केवळ ब्राह्मणांनी वाचावेत का? जाणून घ्या श्री श्री रविशंकर यांनी दिलेले सुंदर उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:52 IST

वेदांमध्ये काय आहे? ते कोणी वाचावेत? ते वाचल्याने ब्रह्मज्ञान प्राप्त होते म्हणतात, पण ते वाचण्याआधीच अनेकांच्या मनात शंका कुशंका घर करतात, त्यावर हे उत्तर!

हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. पुरातन धर्म आहे. याबद्दल कुठेही वाद नाही. वाद आहे तो प्राचीन म्हणजे किती प्राचीन, याबद्दल स्मृतिकार मनूने 'वेदोखिलं धर्ममूलं, स्मृतिशीले च तद्विदाम् आचारश्चैव साधूनाम् आत्मन: तुष्टिरेव च!' असे म्हटले आहे. या सुप्रसिद्ध श्लोकात प्रथमत: वेद प्रामाण्य, वेदानुसार करायचे आचार, साधुसंतांचे वागणे आणि धर्माचरण अशी सविस्तर माहिती मिळते. 

धर्म ही संकल्पना वेदकालापासून किंवा त्याच्याही आधीपासून आहे हे मानल्यानंतर स्वाभाविकच वेद किती प्राचीन असावेत हा प्रश्न निर्माण होतो. याबद्दल लोकमान्य टिळक, चिंतामणराव वैद्य, महामहोपाध्याय पा.वा.काणे इ. मान्यवरांच्या मते हा काळ इसवीसनापूर्वी चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा असावा. कृष्णशास्त्री राजवाडे यांच्यासारख्या संशोधकांनी मात्र वेदकाल हा ३५ हजार वर्षांहून प्राचीन असावा असे अनुमान केले आहे. 

अशा वेद ग्रंथांबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिथे कुतूहल तिथे शंका उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. अशीच एक शंका एका अनुयायीनी गुरु श्री श्री रविशंकर यांच्याकडे उपस्थित केली होती, ''वेदाचे पठण कोणी करावे? तो अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे का?' यावर ते उत्तरले, 'वेदांचे पठण कोणीही करू शकतो. त्याला धर्म जातीची बंधने नाहीत. वेदाभ्यास करून ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण झाला. ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नसून तो क्रियावाचक आहे. तीच बाब क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांचीही! ही कामानुसार ठरवलेली वर्णव्यवस्था आहे. तिला जातीव्यवस्था हे नाव दिल्यामुळे मूळ संकल्पनेत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे वकिलीचा अभ्यास करणारा वकील, डॉक्टरकीचा अभ्यास करणारा डॉक्टर होतो, तसा वेदांचा अभ्यास करून ब्रह्मज्ञान मिळवणारा ब्राह्मण होतो. उलट ते ज्ञान सर्वांनी घ्यावे आणि सुज्ञ व्हावे.'' 

इतक्या प्रदीर्घ कालावधीत तो धर्म अखंडितपणे सातत्याने टिकून राहिला त्या मूळ प्रवाहात अनेकानेक विचारांच्या उपप्रवाहांचा समावेश होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वेदप्रामाण्य हा हिंदुधर्माचा प्रमुख निकष असला तरी वेदकाळात ज्यांची पुसटती कल्पनाही येणे शक्य नव्हते अशा बहुविध बदलांना आणि आघातांना मागील हजारो वर्षात मानवी समाजाला वारंवार सामोरे जावे लागले आणि त्या त्या वेळी समाजाला ययोग्य मार्गदर्शन करणे हेच ज्यांनी स्वत:चे जीवनकर्तव्य मानले अशा ऋषीमुनींनी भिन्न भिन्न काळी आपापल्या मतानुसार जे जुने यमनियम पुन्हा नव्याने सांगितले, प्रसंगी त्यात बदल केले अथवा नवीन नियम घालून दिले, तेच समाजासाठी जागरुक असलेले धर्मशास्त्रज्ञ पुढे स्मृतिकार म्हणून अखिल हिंदुना मार्गदर्शक ठरले. 

मूळ वेदातील धर्मविषयक वचनांना अनुसरून मधल्या काळात धर्मसूत्रे म्हटली जाणारी काही सूत्रे प्रचलित होती, काही कालौघात नष्ट झाली. नंतरच्या काळात विविध अग्रेसर मुनींनी जे सुबोध आणि आदर्शभूत ठरणारे स्मृतिग्रंथ लिहिले त्यांनाच विशेष महत्त्व प्रप्त झाले आणि ते महत्त्व आजपर्यंत अखंडपणे टिकून आहे.