शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
2
"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"
3
पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी : कंगना
4
सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री
5
मंगेशकरांना जमीन दान करुन पश्चात्ताप होतोय..! दीनानाथ रुग्णालयासाठी जमीन देणाऱ्यांची खंत
6
"तू एक काम कर..."; मरणाच्या दारातून परतलेल्या रिषभ पंतला आशिष नेहराने दिलेला मोलाचा सल्ला
7
जयपूरमध्ये व्यावसायिकाने ९ जणांना चिरडले; दारू पिऊन पळवली ७ किमी गाडी, पोलिसांच्या गाड्याही सोडल्या नाही
8
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन!
9
जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी
10
धक्कादायक! आणखी १५ वर्षं खेळायचं होतं पण..., क्रिकेटपटूने २७ व्या वर्षीच स्वीकारली निवृत्ती
11
...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके
12
Nashik: नाशिकमध्ये पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; मध्यरात्री घडला थरार
13
व्वा रे पठ्ठ्या! कमी गुणांमुळे शाळेने काढलं पण 'तो' खचला नाही; कष्टाने बदललं नशीब, झाला IPS
14
पीपीएफ योजनेचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज कधी करावा? 'ही' तारखी चुकली तर सर्व मेहनत पाण्यात
15
"सहा वर्षांपासून मला एकही ऑफर मिळाली नाही कारण.."; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव
16
राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
17
शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; रात्री सप्तपदी अन् सकाळी नववधूचा मृत्यू
19
"मला जे करायचं होतं ते करता येत नव्हतं...", 'चला हवा येऊ द्या'बद्दल नेमकं काय म्हणाली श्रेया बुगडे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इलॉन मस्क गोत्यात? या कारणावरुन पहिल्यांदाच आमने-सामने

मधल्या बोटात अंगठी घालावी की घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते? वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:55 IST

नीलमच्या अंगठीचा डोळस पणे वापर करावा आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानंतरच मधल्या बोटात अंगठी घालण्याचा निर्णय घ्यावा. 

मधल्या बोटात म्हणजे मध्यमात अंगठी घालू नये हा गैरसमज आहे. परंतु हे मात्र खरे आहे, की त्यात शोभेची अंगठी किंवा अन्य रत्नजडित अंगठी घातल्याचा लाभ होणार नाही. तर त्या बोटात विशिष्ट अंगठीच घालावी लागते. ती अंगठी कोणती, ते जाणून घेऊया. 

'मध्यमा' अर्थात मधले बोट हे शनीचे बोट मानले जाते. शनी ग्रहाची वृत्ती विलासी नाही. त्यामुळे सुखोपभोग वगैरे त्या ग्रहाला माहीतच नाही. त्यांना माहीत आहे, ती फक्त शिस्त, न्याय आणि प्रामाणिकपणा. ज्या व्यक्तीला हे तीन गुण आचरणात आणता येतील, त्यांनीच शक्यतो मधल्या बोटात आंगठी घालण्याचा अट्टाहास करावा. 

त्या अंगठीमध्ये शनीचे प्रिय रत्न नीलम परिधान करता येऊ शकते. हे रत्न अन्य बोटातील अंगठीमध्ये वापरून उपयोग नाही. तिची योग्य जागा मधल्या बोटात असते. म्हणून इतर कोणतीही शोभेची अंगठी वापरण्याऐवजी नीलम ची अंगठी वापरल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. 

शोभेच्या किंवा सोन्या,चांदीच्या रत्न जडित अंगठ्या मधल्या बोटात वापरल्यास त्रास होऊ शकतो का? तर त्याचे उत्तर आहे हो, त्रास होऊ शकतो.  एकवेळ शोभेच्या अंगठीचा त्रास होणार नाही, कारण ती तात्पुरती वापरली जाते. याउलट सोन्या-चांदीच्या अंगठ्या कायमस्वरूपी घातल्या जातात.  त्या अंगठ्या घालण्याचे शास्त्र अथवा ज्योतिषी कारण समजावून घेतले नाही, तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे बोट शनी देवांचे आहे. त्यांची विरक्त वृत्ती अशा चैनीच्या गोष्टींना विरोध दर्शवते. शनी ग्रहाचा साडेसातीशी आणि मृत्यूशी थेट संबंध असल्यामुळे विषाची परीक्षा न घेणे चांगले. वापरायची झाल्यास नीलम ची अंगठी वापरावी, ते सुद्धा तुम्हाला त्याची गरज असेल तरच! ज्योतिषी सल्ल्यानुसार ग्रहांना अनुकूल ठरणारे खडे वापरावेत. अकारण वापरल्यास त्याचा अतिरिक्त लाभ होत नाही. म्हणून रत्न असो किंवा रुद्राक्ष या गोष्टींचा ज्योतिष शास्त्राशी संबंध असल्यामुळे ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्यांचा केलेला वापर हितावह ठरतो. 

साडेसातीच्या काळात नीलम अंगठी वापरण्याचा सल्ला विशेषतः दिला जातो. त्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होऊन, ग्रहदशा अनुकूल होते. शनी ग्रहाची अनुकूलता लाभते. यासाठी नीलमच्या अंगठीचा डोळस पणे वापर करावा आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानंतरच मधल्या बोटात अंगठी घालण्याचा निर्णय घ्यावा.