शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2024: पन्हाळगडात सोमेश्वर महादेवावर शिवाजी महाराजांनी केला १ लक्ष चाफ्याच्या फुलांचा अभिषेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:53 IST

Shiv Jayanti 2024: आज सोमवार आणि शिवजयंती, त्यानिमित्त शिवाजी महाराजांच्या शिवभक्तिचे दर्शन घडवणारा एक प्रसंग पाहू!

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंमुळे महाराजांवर बालपणापासूनच देव, देश, धर्माचे संस्कार झाले होते. एकीकडे शस्त्राचे तर दुसरीकडे शास्त्राचे प्रशिक्षण ते घेत होते. त्यांच्या देशभक्तीला देवभक्तीची जोड होती. 'हे राज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा' हे त्यांचे भावोद्गार होते. बालपणी आईबरोबर कथा कीर्तनाला जात असल्यामुळे त्यांच्यावर रामायण, महाभारत, भागवत, हरीकथेचे संस्कार झाले होते. त्यांना उंच डोंगरावर असलेले देवीचे मंदिर, दऱ्याखोऱ्यात असलेले शिवालय विशेषतः आवडत असे. तिथे गेल्यावर ते ध्यानमग्न होत असत. अशाच एका शिवालयाचा प्रसंग जाणून घेऊया. 

स्वराज्याची मोहीम सुरू असताना पन्हाळगड ताब्यात घेण्याची जबाबदारी महाराजांनी आपले निष्ठावंत सरदार कोंडाजी फ़र्जंद यांच्यावर सोपवली होती. कोंडाजींनी मावळ्यांच्या छोट्याशा तुकडीसह मोठ्या शिताफीने गड ताब्यात घेतला आणि महाराजांना विजय वार्ता कळवली. पन्हाळगड प्रिय असल्याने महाराज स्वतः अभिनंदन करण्यासाठी गडावर पोहोचले. या विजयोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनी पन्हाळ गडावरील सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात एक लक्ष सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक करण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार तजवीज घडवून संकल्पपूर्ती करवून घेतली. शिवाजी महाराजांची भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा सुगंधी प्रसंग, कायमच स्मरणात राहणारा आहे. 

पन्हाळा गडाचे पुराणकाळातील नाव 'ब्रम्हगिरी' असे होते. यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न 'करण्याच्या हेतूने येथे 'सोमेश्वर लिंग' व 'सोमेश्वर सरोवर' निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव 'ब्रम्हगिरी' असे पडले.जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव 'प्रणालक' किंवा 'पद्मनाल' असे आले आहे. यातून 'पनाला' शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव 'शहानबी- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो 'पन्हाळा' या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषण  कवीने आपल्या काव्यात यास 'परनालगड' असे म्हटले आहे. गडाच्या नावात अनेक भेदाभेद झाले तरी पन्हाळा अभेद्य राहिला, सोमेश्वरही आशीर्वाद देत राहिला आणि त्याच्यावर सोनचाफी अभिषेक करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही संस्मरणीय ठरला.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर