शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Sheetala Saptami 2023: २३ ऑगस्ट रोजी आहे गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:42 IST

Shravan Vrat 2023: रोजच्या कामाच्या धबडग्यातून बायकांना एक दिवस हक्काची सुटी देणारे शीतला सप्तमीचे व्रत आपणही केले पाहिजे. 

शीतला सप्तमी व्रत हे एक काम्यव्रत असून ते स्त्रियांनी करावे अशी प्रथा आहे. भारतात विविध भागात वेगवेगळ्या वेळी हे व्रत केले जाते. उत्तरेकडे हे आषाढ कृष्ण सप्तमीला तर इतर काही ठिकाणी श्रावण कृष्ण सप्तमीला केले जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात श्रावण शुक्ल सप्तमीला हे व्रत करतात. २३ ऑगस्ट रोजी हे व्रत करायचे असल्याने त्यादिवशीची पूर्वतयारी आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्टला करता येईल.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध या ग्रंथात या व्रताची सविस्तर माहिती दिली आहे. या दिवशी शीतलादेवीची घरी किंवा देवळात जाऊन यथासांग पूजा करावी. तसेच आठ वर्षांहून लहान वयाच्या सात मुलींना जेवू घालावे. असे विधी असलेले एक व्रत शीतला व्रत म्हणूनही ओळखले जाते. 

प्रामुख्याने शीतला देवीला थंड अन्न आवडते म्हणून आदल्या दिवशी सर्व स्वयंपाक करून त्याचा या सप्तमीच्या दिवशी नैवेद्य दाखवतात. या सप्तमीला पूर्ण दिवसात ताजा गरम स्वयंपाक केला जात नाही. या व्रताची एक कथा आहे -

हस्तिनापुराच्या इंद्रद्युम्न नामक राजाला महाधर्म नावाचा मुलगा आणि गुणोत्तमा नावाची मुलगी होती. यथाकाळ या मुलीचा विवाह झाला. विवाहानंतर सासरी जाताना वाटेत तिचा पती रथातून अदृश्य झाला. या अचानक ओढवलेल्या आपत्तीने नववधू गुणोत्तमा शोक करू लागली. पण नंतर धीर करून तिने मोठ्यांच्या सांगण्यावरून शीतलादेवीची सर्व शीतलोपचाराने मनोभावे पूजा केली. देवीच्या कृपेने गुणोत्तमेचा पती तिला परत मिळाला. पुढे दोघांनी सुखाचा संसार केला.

गृहिणींना एक दिवस स्वयंपाक करण्याच्या कष्टापासून मुक्ती देणारे हे व्रत जरूर करावे. त्यामुळे सर्वांनाच गरम अन्नाची किंमत कळू शकेल. मात्र येथे शिळे अन्न याचा अर्थ नासलेले, खराब होऊ लागलेले अन्न नव्हे, तर दुसऱ्या दिवशीही ज्या अन्नाच्या चवीत, रंगात वा सुगंधात फरक पडणार नाही. जसे की वेगवेगळ्या तऱ्हेच्या पुऱ्या, दशम्या, सुक्या भाज्या, सुक्या चटण्या असे जिन्नस करणे अपेक्षित आहे. आता फ्रिजमुळे अन्न खराब होण्याचे भय राहिले नाही. दहीवडे, बुंदीरायते, विविध फळांची शिकरण असे खऱ्या अर्थाने शीतल पदार्थही या दिवसाच्या निमित्ताने केले, तर सर्वांनाच हे व्रत तनामनाला खऱ्या अर्थाने शीतलदायक वाटेल. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्न