शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Shani Sadesati 2023: शिव शंभुचे रुद्राक्ष करेल शनीच्या साडेसातीपासून रक्षण; त्याचा वापर कधी व कसा करतात ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:00 IST

Shani Sadesati 2023: शनी आणि रुद्राक्षाचा संबंध जाणून घ्या आणि ज्योतिषांच्या मार्गदर्शनाने त्याचा वापर करा, लाभ होईल!

रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रह नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते. याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडादेखील शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते. असे मानले जाते की रुद्राक्षाची शक्ती अशी आहे की जो त्याचा योग्य वापर करतो तो सर्व प्रकारच्या संकटांवर मात करतो. मात्र जर कोणी नियमांशिवाय ते परिधान केले तर त्याचा विपरीत परिणाम होतो. याशिवाय नियमानुसार रुद्राक्ष धारण केल्यास शनीच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.

रुद्राक्ष आणि शनीचा  संबंध : धार्मिक ग्रंथानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे. अनादी काळापासून भगवान शंकर अलंकार म्हणून रुद्राक्ष परिधान करतात. तसेच रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रहस्थितीवर नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते.याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडाही शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते. रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. नियमानुसार ते परिधान केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

शनीसाठी रुद्राक्षाचा वापर : शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राक्षाचा नियमित वापर करावा. मात्र त्याचे नियम आधी जाणून घ्यावेत. जसे की- नोकरी-रोजगारातील अडचणी दूर करण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. एकाच वेळेस ३ दहा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणे अधिक फायदेशीर ठरते. हा रुद्राक्ष शनिवारी लाल धाग्यात घालून गळ्यात घाला. याउलट कुंडलीत शनीचा अशुभ प्रभाव असेल तर ते टाळण्यासाठी एक मुखी आणि अकरा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणे शुभ मानले जाते. १ एक मुखी आणि २ अकरा मुखी रुद्राक्ष यांना लाल धाग्याने एकत्र बांधून धारण करा.

साडेसाती सुरु असताना रुद्राक्षाचा वापर: आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी गळ्यात ८ मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. तसेच पंचमुखी रुद्राक्ष वापरणेही लाभदायक ठरते.  रुद्राक्ष माळ धारण करण्यापूर्वी शनि आणि शिवाच्या मंत्रांचा जप करणे शुभ असते. रुद्राक्ष प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतेच असे नाही. त्यासाठी आपले ग्रहबळ देखील चांगले असावे लागते. यासाठीच रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेण्याची सूचना केली जाते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष