आयुष्यात सुख दुःखाचा फेरा सुरूच असतो. मात्र तुमच्या बाबतीत गेल्या काही दिवसात फक्त अडचणींचा सामना करावा लागत असेल तर लेखात दिलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय २४ मे २०२५ रोजी शनी प्रदोष (Shani Pradosh 2025) मुहूर्तावर सुरू करा. कारण सोमवारी अर्थात २६ मे २०२५ रोजी शनि जयंती(Shani Jayanti 2025) आणि सोमवार आहे. या योगावर दिलेले उपाय निश्चितपणे लाभदायी ठरतील!
प्रदोष आणि शिवरात्रि एकत्र येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हटले जाते. प्रत्येक वारानुसार त्याची वेगळी ओळख आहे. त्याला जोडूनच शिवरात्री आली आहे. या संयोगावर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय २४ मे पासून पासून सलग १३ दिवस करायचा आहे. तो उपाय कोणता ते पाहू!
>> तेरा दिवस एक वेळ ठरवून शिव मंदिरात जावे. >> महादेवाला प्रिय असे दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. >> याबरोबरच आंब्याच्या झाडाची ९ पानं शिवलिंगावर वाहावीत. >> शिवरात्री आणि प्रदोष या मुहूर्तावर केलेली सुरुवात लवकर फळ देईल. >> जर आजच्या मुहूर्तावर सुरुवात करता आली नाही, तर कोणताही सोमवार निवडून १३ दिवस सातत्य ठेवावे. >> आम्रपल्लव आपण शुभकार्यासाठी वापरतो, म्हणून आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ती पानं महादेवाला वहावीत. >> वरील सर्व गोष्टी अर्पण करून झाल्यावर आपली समस्या मनातल्या मनात महादेवाला सांगावी आणि त्यातून मार्ग दाखव अशी मनोभावे प्रार्थना करावी. >> सदर उपाय सलग तेरा दिवस केल्यामुळे अडी अडचणीतून मार्ग सापडतो असा भाविकांचा अनुभव आहे!
लेखातील माहिती ज्योतिष शास्त्रातील सामान्य गृहीतकांवर आधारित आहे, याची नोंद घ्यावी.