शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Shani Pradosh 2024: शनी प्रदोष आणि शिवरात्री या संयोगावर सलग १३ दिवस करा 'हा' ज्योतिष शास्त्रीय उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:04 IST

Shani Pradosh 2024: नवीन वर्षाकडे वाटचाल करताना गत वर्षातल्या अडचणीतून सुटका मिळावी म्हणून १३ दिवसाचा उपाय रविवारपासून सुरु करा! 

आयुष्यात सुख दुःखाचा फेरा सुरूच असतो. मात्र तुमच्या बाबतीत गेल्या काही दिवसात फक्त अडचणींचा सामना करावा लागत असेल तर लेखात दिलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय आजपासूनच सुरु करा. आज शनी प्रदोष (Shani Pradosh 2024) आणि लागूनच शिवरात्री (Shivratri 2024)असा संयोग  २८ आणि २९ डिसेंबर रोजी जुळून आला आहे. 

प्रदोष आणि शिवरात्रि एकत्र येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. 

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हटले जाते. प्रत्येक वारानुसार त्याची वेगळी ओळख आहे. त्याला जोडूनच शिवरात्री आली आहे. या संयोगावर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय २९ डिसेंबर पासून सलग १३ दिवस करायचा आहे. तो उपाय कोणता ते पाहू!

>>तेरा दिवस एक वेळ ठरवून शिव मंदिरात जावे. >>महादेवाला प्रिय असे दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. >>याबरोबरच आंब्याच्या झाडाची ९ पानं शिवलिंगावर वाहावीत. >>शिवरात्री आणि प्रदोष या मुहूर्तावर केलेली सुरुवात लवकर फळ देईल. >>जर आजच्या मुहूर्तावर सुरुवात करता आली नाही, तर कोणताही सोमवार निवडून १३ दिवस सातत्य ठेवावे. >>आम्रपल्लव आपण शुभकार्यासाठी वापरतो, म्हणून आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ती पानं महादेवाला वहावीत. >>वरील सर्व गोष्टी अर्पण करून झाल्यावर आपली समस्या मनातल्या मनात महादेवाला सांगावी आणि त्यातून मार्ग दाखव अशी मनोभावे प्रार्थना करावी. >>सदर उपाय सलग तेरा दिवस केल्यामुळे अडी अडचणीतून मार्ग सापडतो असा भाविकांचा अनुभव आहे!

लेखातील माहिती ज्योतिष शास्त्रातील सामान्य गृहीतकांवर आधारित आहे, याची नोंद घ्यावी. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधी