शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Shakambhari Purnima 2024: आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आवर्जून म्हणा देवीचे सिद्धमंत्र!; होतील अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:33 IST

Shakambhari Navratri 2024: आज शाकंभरी नवरात्रीचा समाप्तीचा दिवस, यानिमित्ताने आपल्या आणि विश्वकल्याणार्थ सामूहिक प्रार्थना करूया.

शाकंभरी नवरात्रीत आपण भक्तीचा जागर केला. त्यातच अयोध्येत रामाच्या प्रतिष्ठापनेने नवरात्रीचा उत्साह द्विगुणित झाला. आज देवीचे नवरात्र पूर्ण होऊन उद्यापनाचा दिवस अर्थात शाकंभरी पौर्णिमा. यानिमित्ताने सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि विश्वकल्याण व्हावे म्हणून 'सप्तशती'मधील सिद्धमंत्रांचा जप करूया. 

सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो. म्हणून तर, सहस्रावर्तन असो किंवा सहस्रजप, हे संकल्प सिद्धीस जावेत, म्हणून भाविक संघटित होऊन प्रार्थना करतात. आपणही शाकंभरी पौर्णिमेच्या  निमित्ताने एकत्रितरित्या या सिद्धमंत्रांचा अवलंब करूया. 

सप्तशती या प्रासादिक ग्रंथात ७०० मंत्ररूप श्लोक आहेत. या ग्रंथात श्रीमदभगवतीच्या कृपेचा महिमा वर्णन केला आहे. तसेच अनेक गूढ साधना रहस्यांचाही यात समावेश आहे, असे म्हणतात. या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पारायणाने भक्त मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

मंत्रांचे उच्चार वातावरणनिर्मिती करतात. ज्याप्रमाणे संगीत सभेत तानपुरा, तबला, बासरी, हार्मोनिअम या वाद्यवादनाने सभेची पार्श्वभूमी तयार होते आणि त्यात गायकाच्या सुरेल रचनांची भर पडते, त्याप्रमाणे भगवन्नाम घेत असताना स्तोत्रपठण तसेच मंत्रोच्चारण यामुळे योग्य परिणाम साधला जातो. जीभेला चांगले वळण लागते. सकारात्मकता वाढते,म्हणून मंत्रांचे नित्यपठण करायचे असते. आपणही पुढील मंत्रांचे पठण करूया.

इत्थं यदा यदा बाधा, दानवोत्था भविष्यति,तदा तदावतिर्यादं करिष्याम्यरिसंक्षयम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं शत्रुभ्यो न भयं तस्य,दस्थुतो वा न राजत:न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्संभविष्यति।।

ऐं ऱ्हीम क्लीं दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परम् रक्षोभूतशिाचानां पठनादेव नाशनम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं मम प्रभावास्हिंहाद्या दस्यवो वैरिणस्तथा,दूरादेव पलायन्ते स्मरनश्चरितं मम् ।।

दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके,मम सिद्धीमसिद्ध वा स्वप्ने सर्व प्रदर्शय।।

या मंत्रजपांचे नित्यपारायण करावे.हे मंत्रोच्चार कठीण वाटत असले, तरी ते योग्य परिणाम साधतात. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करता, येत्या नवरात्रीत रोज स्नान करून, शुचिर्भुत होऊन, आसनस्थ होऊन उपरोक्त मंत्रपठण करावे. देवीला आपली इप्सित मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि केवळ आपलेच नाही, तर सर्वांचे भले कर, रक्षण कर आणि सर्वांना संकटमुक्त कर, असे मागणे मागावे. जगदंबsss  उदयोस्तु!

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर