शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त करा देवीची विशेष उपासना; भाग-६

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:20 IST

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त देवीचे स्तोत्र आणि त्याचा भावार्थ जाणून घेऊया.

>> रवींद्र गाडगीळ 

कटी तट पीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंड रुचे, प्रणत सुरासुर मौलि मणि स्फुर दंशूक सन्नख चंद्र रुचे | जित कनकाचल मौलि मदोर्जित गर्जित कुंजर कुंभ रुचे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१६||

तू परिधान केलेली जी सुंदर पिवळी रेशमी साडी आहे, तिच्या रंगासमोर सूर्याचे तेजहि फिके पडत आहे, तुझ्या चरणाशी लीन झालेल्या देवदेवतांच्या मुकूटमण्यांचे तेज तुझ्या सर्वांगावर असे शोभायमान आभा निर्माण करत आहे की, जसे सुमेरु पर्वतावरील मदोन्मत्त हत्तींच्या गंडस्थळातून तेजस्वी मद ओघळून ते तेज चमकत आहे. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

विजित सहस्त्र करैक सहस्त्र करैक सहस्त्र करैक नुते, कृत सुर तारक संगर तारक संगर तारक सूनुनुते | सुरथ समाधी समान समाधी समान समाधी सुजाप्य रते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१७||

सहस्त्र बाहू तारकासुर राक्षसाला मारुन समस्त देवतांना तारणारा तारक, सहस्त्र नक्षत्रांनाही लाजवणारा, तुझा सुंदर शिवपुत्र कार्तिकेय, जो  तुझ्या पराक्रमापुढे नतमस्तक होतो, सप्तशती पाठात दिलेल्या सुरथ नावाच्या राजाची व समाधी नावाच्या वैश्य साधूची संसारव्यथेची चिंता एकच असून त्यांनी जी समाधी लावून तुझे चिंतन केले व तू त्यांच्यावर कृपावंत होऊन जे समाधान दिलेस, म्हणून हे महिषासुरमर्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

पदकमलं करुणा निलये, वरीवस्यती योsनुदिनं  सुशीवे, अयी कमले कमलानिलये कमलानिलय: सकथं न भवेत | तव पदमेव परं पद्मस्वीती शीलयतो मम कीं न शिवे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१८||

हे कमलिनी, कमलासिनी, करूणामयी, कल्याणमयी पार्वती, जो तुझी रोज पूजा, पाठ, चिंतन, जप, सेवा करतो तो तुझ्याचसारखा कमलालय (लक्ष्मीचे भंडार) होत असेल, मी तर अशीच इच्छा सतत मनात धरून असतो की तुझे पद हेच सर्वश्रेष्ठ पद आहे. जगात तू असल्याशिवाय कोणालाच काडीची किंमत नाही, जोवरी आहे पैसा, लोक म्हणतील जवळ बैसा बैसा! तूच आमचे कल्याण करणार आहेस. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

हे शाकंभरी देवी, आमच्यावर कृपावंत हो आणि हा जागतिक स्तरावरचा कोरोना नामक आजार दूर कर, ही तुझ्याच चरणी प्रार्थना. आम्ही प्रत्येक जीव जगवू, जगू देऊ, त्यांना अभय देऊ. आम्हाला नेहमी निरोगी ठेवणारा आयुष्यभर शाकाहार करीत राहू. पुढील श्लोक उद्या. 

टॅग्स :Navratriनवरात्री