शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

September Born Astro: ध्येयनिष्ठ आणि कर्तृत्त्ववान अशी ओळख असते सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 11:01 IST

September Born Astro: कोणत्याही व्यक्तिमध्ये गुण दोष हे असतातच, त्यात राशीचा, महिन्याचा, तारखेचा प्रभाव कसा पडतो ते जाणून घेऊ.

जन्माला आलेल्या व्यक्तींवर राशीचा, ग्रहाचा, संबंधित महिन्याचा प्रभाव दिसून येतो. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यातील जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तीमत्त्वाचे गुण!

हे लोक ध्येयाने झपाटलेले असतात. स्वत:च्या प्रचंड प्रेमात असतात. त्यांच्याबद्दल दुसऱ्याने काही टीका केलेली त्यांना सहन होत नाही. अतिशय शिघ्रकोपी अशी यांची ओळख आहे, परंतु ते नेहमी या भ्रमात असतात, की आपल्यापेक्षा शांत आणि विनम्र दुसरे कोणीच नाही. टोमणे मारण्यातही ते पुढे असतात. 

यांच्यात शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते. कामाच्या बाबतीत ते तहानभूक विसरून मान पाठ एक करतात. दिवसाचे चोवीस तास काम करण्याची त्यांची तयारी असते. एवढी ऊर्जाही त्यांच्याजवळ असते. त्यांच्या या गुणाचे इतरांनी कौतुक करावे असे त्यांना नेहमी वाटत राहते.  या स्वभावामुळे त्यांची खोटी प्रशंसा करून लोक आपले काम काढून घेतात आणि यांना ते कळतही नाही. 

शर्यत कोणतीही असो, त्यात स्वत:ला अग्रेसर कसे ठेवायचे हे यांच्याकडून शिकावे. कधी कधी शर्यतीत पुढे राहण्यासाठी ते स्वार्थीदेखील होतात. दुसऱ्यांकडून आपले काम काढून घेण्यासाठी वाट्टेल तेवढे गोड बोलतील. प्रेमातही त्यांचा अहंकार आडवा येतो. 

त्यांच्या मनात काय सुरू असते हे त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनाही समजू शकत नाही. एवढी गोपनियता ठेवण्यात ते तरबेज असतात. मात्र जवळच्या माणसांकडून त्यांच्या भरमसाठ अपेक्षा असतात. 

वृत्तीने दानशूर असतात आणि व्यवहाराच्या बाबतीत चोख असतात. कोणाला काही दिले तर व्याजासकट परत घेतात. नीटनेटके राहणीमान त्यांना आवडते. करिअर आणि प्रेम यापैकी त्यांच्या वाट्याला काहीतरी एक परिपूर्ण येते. प्रेम, वैवाहिक जीवन सुखाचे असेल तर करिअर मध्ये फारसे यश मिळत नाही आणि करिअरमध्ये अग्रेसर असले, तर वैवाहिक जीवनात फार आनंद घेता येत नाही. त्यामुळेच की काय हे लोक असंतुष्ट असतात. नवीन गोष्टी मिळाल्या नाहीत की ते नाराज असतात. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक गायन, वादन, लेखन, विज्ञान या क्षेत्रात करिअर करताना आढळतात.

या महिन्यात जन्मलेल्या मुलींबद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडतील. अर्थात हे कौतुकाने नाही, तर गमतीने म्हटले आहे. या महिन्यात जन्मलेल्या मुली स्वत:ला सर्वज्ञ समजतात. याच इगो प्रॉब्लेममुळे प्रेमाच्या तसेच वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अपयशी ठरतात. एखाद्याच्या पाठीमागे त्याची उणीदुणी काढणे हा त्यांचा आवडता छंद असतो. अशा मुलींकडे प्रतिभा असूनही केवळ अहंकारामुळे त्यांच्या गुणांची कदर होत नाही. 

त्या दिसायला सुंदर असतात परंतु स्वभावाने वाईट असतात. अर्थात त्यातही अपवाद आहेच! काही जणी अतिशय भोळ्या भाबड्या, तर काही जणी अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या असतात.व्यक्तिची पारख करण्यात त्या चुकतात, त्यामुळे चुकीच्या व्यक्तिची निवड करून पश्चात्ताप सहन करतात. 

एकूणच काय, तर या महिन्यात जन्मलेले स्त्री असो वा पुरुष, यांनी आपला इगो बाजूला ठेवून जाणकारांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले पाहिजे. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि शर्यतीत टिकून राहण्यासाठी नाही, तर स्वत:ला आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग करिअर असो नाहीतर कुटुंब, तुम्ही कायम आनंदी राहू शकाल. 

त्यासाठी या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींचा आदर्श तुम्ही ठेवू शकाल. या नामांकित लोकांनी आपल्या दुर्गुणांवर मात करून यश मिळवले, तसे तुम्हालाही मिळवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, लता मंगेशकर, आशा भोसले, अक्षय कुमार, करिना कपूर, सुखविंदर सिंग ही काही आदर्श उदाहरणे समोर ठेवता येतील...!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष