शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

आनंद मिळवण्यासाठी स्वतःमध्ये डोकावून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 4:38 PM

आनंद हा काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगा नाहीये, तो तुम्ही तुमच्या आतच, खोलवर शोधून काढता. ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत खोलवर खणून शोधून काढता.

सद्गुरु: मी तुम्हाला कसे सांगू? हा प्रश्न खरं म्हणजे आनंदाच्या स्वरुपाच्या विशिष्ट गैरसमजुतीतून उदभवू शकतो. आज अगदी मनाला उत्तेजित करणार्‍या औषधं, मादकपदार्थांनासुद्धा “आनंद” असे नाव देण्यात येते. तुम्ही जेंव्हा “आनंद” असे म्हणता, तेंव्हा पाश्चात्य देशातील लोकांना त्यांना असे वाटते की तुम्ही एखाद्या विशिष्ट औषधी गोळी किंवा औषधाबद्दल बोलता आहात.

“खरा आनंद” आणि “खोटा आनंद” अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही जेंव्हा सत्यात असता, तेंव्हा तुम्ही आनंदात असता. जेंव्हा तुम्ही खरोखरच सत्याच्या सान्निध्यात असता, तेंव्हा साहजिकच तुम्ही आनंदात असाल. आनंदी असणे आणि आनंदी नसणे ही तुमच्यासाठी तुम्ही सत्यात आहात की नाही याची लिटमस टेस्ट करण्यासारखे आहे. हा प्रश्न कदाचित एका विशिष्ट मानसिकतेतून येतो: “मी जर सूर्यास्त पहात असेन, मी आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेंव्हा प्रार्थना करतो, मी जर आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेंव्हा ध्यान करत असतो आणि आनंदी होतो, तेंव्हा तो खरा आनंद असतो का?बहुतेक लोकांमध्ये सुखोपभोग म्हणजेच आनंद अशी गैरसमजूत आहे. सुखोपभोग तुम्ही फार काळ टिकवून ठेवू शकणार नाही. पण आनंद ही अशी अवस्था आहे जी कशावरही अवलंबून नाही. सुखोपभोग हा नेहेमी कशावर किंवा कोणावर तरी अवलंबून असतो. पण आनंद हा कशावर किंवा कोणा व्यक्तीवर अवलंबून नाही. तो तुमचा प्राकृतिक स्वभावच आहे. एकदा तुम्ही त्याच्या सान्निध्यात आलात की तुम्ही त्यात स्थित होता, एवढंच.

आनंद हा काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगा नाहीये, तो तुम्ही तुमच्या आतच, खोलवर शोधून काढता. ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत खोलवर खणून शोधून काढता. हे जणू एक विहीर खोदण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमचं तोंड उघडून पावसाचे थेंब तोंडात पडण्याची वाट बघत बसलात, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही थेंब तोंडात पडू शकतात. पण तोंड उघडून पावसाची वाट बघत तहान भागवण्याची ही एक अगदी दयनीय आणि निराशजनक स्थिती आहे. त्याशिवाय पाऊस हा काही शाश्वतपणे पडणारा नाही. एखाद, दोन तास पडेल आणि थांबणार.

यासाठीच तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणता – जेणेकरून वर्षभर पाणी उपलब्ध असेल. जे काही तुम्ही खरा परमानंद म्हणता ते एवढंच आहे, तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणली आहे आणि तुम्हाला पाण्याचा सापडलं आहे जे तुम्हाला सदासर्वदा तृप ठेवेल. आता तुम्ही पाऊस पडत असताना तोंड उघडून बसत नाही. नाही. आता तुमच्याजवळ निरंतर पाण्याचा साठा आहे. हाच आहे परमानंद.