शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:40 IST

Sarva Pitru Amavasya 2024: स्वतःचेच श्राद्धविधी तेही जिवंतपणी करण्याची सोय, का आणि कशासाठी व कुठे ते जाणून घेऊ!

पितृ पक्षादरम्यान, लोक पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान इत्यादी श्राद्धविधी करतात. पण भारतात असेही एक मंदिर आहे, जिथे स्वतःचेच श्राद्ध आपल्या जिवंतपणी घालता येते. ही सुविधा कशासाठी व कुठे आहे आणि त्यामागचे कारण काय ते जाणून घेऊ. 

पितृ पक्षाच्या १५ दिवसांत पितरांसाठी श्राद्ध केले जाते. सर्व पितृ अमावस्येला पितृ पक्ष संपतो. या श्राद्धविधीसाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी गया येथे येतात. तीर्थक्षेत्री पिंडदान केल्याने, श्राद्धविधी केल्याने पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते  श्रद्धा आहे. यावर्षी सर्व पित्री अमावस्या (Sarva pitru Amavasya 2024) २ ऑक्टोबरला आहे. ज्यांना कुणाला पितृपक्षात श्राद्धविधी करता आले नाही त्यांना सर्वपित्री अमावस्येला ते करता येतात. पण गया येथे असेही एक मंदिर आहे, जिथे तुम्हाला स्वतःचेच श्राद्ध जिवंतपणी करता येते. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. 

जनार्दन मंदिर, गया 

गयामध्ये मृत नातेवाईकांचे श्राद्ध आणि पिंड दानसोबतच जिवंत लोकांचे, तसेच स्वतःचे श्राद्ध आणि पिंड दान देखील केले जाते. गया येथील जनार्दन मंदिराची वेदी ही संपूर्ण जगात एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध म्हणजेच स्वतःचे पिंडदान जिवंत असताना केले जाते. गया येथील भस्मकूट पर्वतावर मंगला गौरी देवी मंदिराजवळ जनार्दन मंदिर आहे. असे मानले जाते की येथे भगवान विष्णू स्वतः जनार्दन स्वामींच्या रूपात विसावले होते. त्यामुळे हे देवस्थान अतिशय पावन मानले जाते. 

पण जिवंतपणी श्राद्धविधी कशासाठी?

आता प्रश्न असा पडतो की लोक जिवंत असताना पिंडदान करण्याचे कारण काय? ही सुविधा धर्मशास्त्राने अशा लोकांसाठी केली आहे ज्यांना मुले नाहीत किंवा त्यांच्या पिंडदानासाठी त्यांच्या कुटुंबात कोणीही सदस्य नाही. संन्यासी लोक देखील येथे येतात आणि त्यांचे पिंड दान देतात. मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी सांसारिक जीवन सोडले असल्याने, ते गया येथील जनार्दन मंदिराची वाट धरतात. 

मोक्षाचा प्रवास 

श्राद्धविधी मोक्षप्राप्तीसाठी केले जातात. आत्म्याचा प्रवास मानवी देहात येऊन संपला तर त्याला मोक्ष मिळतो. पण त्यासाठी मृत्यूपूर्वी त्याच्या आशा अपेक्षा संपायला हव्यात. त्या संपल्या नाही की आत्म्याला नाईलाजाने पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पुढचा देह धारण करावा लागतो. श्राद्धविधी करताना आत्म्याला शांती मिळून सद्गती मिळावी, हा त्यामागचा हेतू असतो. पितरांच्या नावे नैवेद्य ठेवून त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू असे म्हटले जाते. त्यानंतर कावळा पिंडाला तथा नैवेद्याला शिवतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जनार्दन मंदिरातील सुविधा त्यांच्यासाठीही म्हणता येईल, ज्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या आणि यानंतर आत्मा परमात्म्याशी एकरूप व्हावा हीच अंतिम इच्छा राहते!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षTempleमंदिर