शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Sankashti Chaturthi 2024: जून २०२५ पर्यंत सुख, ऐश्वर्यप्राप्तीसाठी संकष्टीपासून सुरु करा 'हा' प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:00 IST

Sankashthi Chaturthi 2024: १८ डिसेंबर रोजी इंग्रजी वर्ष २०२४ मधील शेवटची संकष्टी; यानिमित्ताने येत्या सहा महिन्यात फळ देणारा उपाय जाणून घ्या!

१८ डिसेंबर रोजी इंग्रजी वर्ष २०२४ मधील शेवटची संकष्टी (Sankashthi Chaturthi 2024) आहे. एव्हाना मनामध्ये येत्या वर्षाचे अर्थात २०२५ (New Year 2025)चे अनेक संकल्प सुरु झाले असतील. त्या संकल्प पूर्तीसाठी संकष्टीच्या उपसाबरोबरच उपासनेची जोड देऊया. देवर्षी नारद यांनी रचलेले संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे, की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते. आणि फळ काय तर? उपासना सुरु केल्यापासून येत्या सहा महिन्यात विद्यार्थ्याला विद्या, गरजवंताला धन, नि:संतान असणाऱ्याला संतती आणि मोक्षार्थ्याला गती मिळते!

हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचेते महर्षी नारद करतात. त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण सुरू करावे यासाठी स्तोत्राचे शब्द पुढीलप्रमाणे.. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधी