हनुमान आणि शनिदेव यांच्यातील मैत्रीचे नाते भारतीय पुराणांतील सर्वात रंजक आणि प्रेरणादायी कथांपैकी एक आहे. आपण अनेकदा पाहतो की, शनिवारी हनुमानाला तेल अर्पण करण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी असते. पण या परंपरेमागे नेमका काय इतिहास आहे? चला जाणून घेऊ.
भारतीय संस्कृतीत हनुमान हा संकटमोचक मानला जातो, तर शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत. अनेकदा शनिदोष दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करण्यास सांगितले जाते. या परंपरेचा उगम थेट रामायण काळातील एका घटनेत दडलेला आहे.
जेव्हा रावणाने शनिदेवाला बंदी बनवले...
कथा सुरू होते रावणाचे पुत्र मेघनाथाच्या जन्मापासून. रावणाला आपल्या पुत्राने अजिंक्य असावे असे वाटत होते. त्यासाठी त्याने सर्व नऊ ग्रहांना त्यांच्या शुभ स्थितीत राहण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायदेवता शनीला हे निसर्गनियमांच्या विरुद्ध वाटले. त्यांनी आपली दृष्टी वक्री केली. यामुळे संतापलेल्या रावणाने शनीला बंदी बनवले आणि लंकेत आणून कारागृहात उलटे टांगून ठेवले.
लंकेतील मुक्तता आणि हनुमानाची सेवा
अनेक वर्ष शनिदेव त्या काळकोठडीत यातना सहन करत होते. कालांतराने जेव्हा माता सीतेच्या शोधात हनुमान लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी रावण दहनावेळी शनिदेवांना पाहिले. हनुमानाने मोठ्या शौर्याने शनिदेवाची त्या बंधनातून मुक्तता केली. मात्र, अनेक वर्ष उलटे टांगल्यामुळे आणि साखळदंडात जखडले गेल्यामुळे शनिदेव अत्यंत अशक्त झाले होते, त्यांच्या सर्वांगाला वेदना होत होत्या.
आपल्या मित्राच्या वेदना पाहून हनुमानाचे मन व्याकुळ झाले. त्यांनी तात्काळ राईचे (मोहरीचे) तेल आणले आणि शनिदेवाच्या पूर्ण शरीराला प्रेमाने मालिश केली. या तेलाच्या मालिशमुळे शनिदेवांच्या यातना कमी झाल्या आणि त्यांना खूप आराम वाटला.
व्हॅलेंटाईन वीक विशेष: स्वप्नात 'या' गोष्टी दिसतायत? मग समजा तुमचा लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय!
शनिदेवाचे वरदान आणि सुरू झालेली प्रथा
हनुमानाने केलेल्या या निस्वार्थ सेवेने शनिदेव प्रसन्न झाले. त्यांनी हनुमानाला वचन दिले:
"हे हनुमंता, ज्याप्रमाणे तू माझ्या वेदना दूर केल्यास, तसंच भविष्यात जो कोणी भक्त तुला राईचे तेल अर्पण करेल, त्याला माझ्या साडेसातीचा, धैय्याचा किंवा शनी पिडेचा कोणताही त्रास होणार नाही."
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात नशिबाचे धनी; आयुष्यभर लाभतं अमाप सुख-समाधान!
तेव्हापासून हनुमानाला तेल वाहण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की, हनुमानाला तेल वाहिल्याने शनिदेव शांत होतात आणि भक्ताच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात.
Web Summary : Offering oil to Hanuman on Saturdays relieves Shani's Sade Sati effects. This tradition stems from Hanuman rescuing Shani from Ravana's prison. Gratitude led Shani to promise freedom from suffering for Hanuman's devotees offering oil.
Web Summary : शनिवार को हनुमान को तेल चढ़ाने से शनि की साढ़े साती का प्रभाव कम होता है। यह परंपरा हनुमान द्वारा शनि को रावण की कैद से छुड़ाने से शुरू हुई। शनि ने हनुमान के भक्तों को तेल चढ़ाने पर पीड़ा से मुक्ति का वादा किया।