शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Rituals: आजही नैवेद्य वाढण्यासाठी केळीच्याच पानांचा वापर केला जातो; जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:04 IST

Health Tips: आपण सण समारंभात केळीची पाने वापरतो, पण पूर्वी रोजचे जेवण केळीच्या पानावर वाढण्याची प्रथा होती, त्याचे फायदे जाणून घेऊ!

आज मार्गशीर्षातला दूसरा गुरुवार (Margashirsha Guruvar 2024). आज अनेक गृहिणी महालक्ष्मीचा उपास करतात. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवतात. मात्र तो वाढतात केळीच्या पानावरच! अनेक प्रकारची आधुनिक भांडी येऊनही केळीच्या पानाचे (Importance of Banana Leaf) महत्त्व तसूभरदेखील कमी झालेले नाही. त्यामागचे कारण जाणून घेऊ. 

पूर्वी स्वयंपाक झाला, की लगोलग पाने घेतली जात. ही पाने कोणती? तर केळीची! कारण, दारोदारी केळीचे झाड असल्यामुळे दोन्हीवेळचे जेवण केळीच्या पानावर किंवा पत्रावळींवर होत असे. शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या पानांना अतिशय महत्त्व होते. मात्र आता पाने घेतो म्हटल्यावर ताटं वाट्या किंवा प्लास्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु, जो स्वाद आणि पोषणमूल्य पानांमध्ये आहे, तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू. 

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात. केळीच्या पानांवर जेवल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.

केळीच्या पानावर जेवण ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचेही पोट भरते व कचऱ्याच्या ढिगाला आळा घालता येतो. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अनेक पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात. 

अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. परदेशातील भारतीय उपहारगृहात विशेषकरून केळीच्या पानावर पारंपरिक जेवण वाढले जाते व त्यास पसंतीही मिळते. म्हणून शक्य तेव्हा आपणही केळीच्या पानावर जेवावे आणि जेवणाआधी हे दान पदरात टाकणाऱ्या ईश्वराचे आठवणीने स्मरण करावे. 

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स