शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सध्या 'या' चार राशींचे नशीब सूर्यासारखे झळकत आहे, मोठा लाभ होण्याचीही शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:18 IST

त्यात तुमचीही रास असेल तर आनंदच आहे, पण जर नसेल, तर विश्वास ठेवा, तुमचेही लखाकण्याचे दिवस नक्की येतील. 

प्रत्येक दिवस काही ना काही चांगले वाईट घेऊन येत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो, यावर त्या परिस्थितीचा निकाल लागतो. यासाठी आपली मनस्थिती, परिस्थिती आणि ग्रहस्थिती अनुकूल असावी लागते. ती ठीक असेल तर वाईटात वाईट परिस्थितीदेखील सहज निभावली जाते. आपली परिस्थिती आणि मनस्थिती बहुतांश ग्रहस्थितीवर देखील अवलंबून असते. त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि परिणामी आपल्या वागण्या बोलण्यावर देखील पडत असतो. त्यामुळे आजचा दिवस ठीक ठाक गेला किंवा वाईट गेला, तरी वाईट वाटून घेऊ नका. रोजचा दिवस नवीन संधी घेऊन येत असतो. 

आता या चार राशीच बघा ना... वृषभ संक्रांतीला सूर्य स्थिती बदलल्यापासून या चार राशी लखलखत आहेत. त्यांच्याबाबत भविष्यात मोठे लाभ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या चार राशी कोणत्या ते पहा. त्यात तुमचीही रास असेल तर आनंदच आहे, पण जर नसेल, तर विश्वास ठेवा, तुमचेही लखाकण्याचे दिवस नक्की येतील. 

या चार राशी पुढीलप्रमाणे आहेत -

वृषभ : सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश हा त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यांना कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. संपत्तीत वाढ होईल आणि व्यवसायात नफा होईल. वाहन खरेदीचा योग येईल. आरोग्य चांगले राहील.

सिंह: सिंह राशीच्या वाट्याला नेहमी खडतर आयुष्य आणि कठीण प्रसंग येतात. परंतु अलीकडेच झालेल्या सूर्याच्या संक्रमणामुळे त्यांना सध्या अतिशय अनुकूल दिवस आले आहेत. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठीही हा काळ चांगला आहे. आरोग्याशी संबंधित अडचणी दूर होतील. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. नवीन काही शिकण्यास प्रारंभ होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

धनु : धनु राशीचे नशीब सध्या जोरात आहे. ही रास आपले काम करवून घेण्यात पटाईत असते. त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. त्याचाच फायदा त्यांना या काळात होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या क्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक होईल. नोकरीतील बदलांसाठी ही योग्य वेळ आहे. 

मीन : मीन राशीचे लोक नेहमी तळमळत असतात. सुखापर्यंत पोहोचता पोहोचता सुख त्यांना हुलकावणी देते. त्यामुळे त्यांची अवस्था पाण्यातून बाहेर निघालेल्या माशाप्रमाणे होते. परंतु, सध्याचा काळ असा आहे की खुद्द सूर्य देव तुमच्या राशीच्या बाजूने उभे असल्यामुळे सुख अलगद येऊन तुमच्या ओंजळीत पडणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेम विवाहासाठी किंवा वैवाहिक आयुष्यासाठी हा काळ सुखद असणार आहे.