शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Relationship tips : 'चिव चिव चिमणे' हे केवळ बडबडगीत नाही तर त्यात दडलाय सुखी संसाराचा मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 12:51 IST

Married Life Tips: आज 'जागतिक चिमणी दिना'निमित्त बालपणी म्हटल्या जाणाऱ्या बडबडगीताची उजळणी करूया आणि सुखी संसाराचा मंत्र जाणून घेऊया. 

'घर दोघांचे' म्हटल्यावर जबाबदारीही दोघांनी घ्यायला हवी. ही साधी सोपी बाब लक्षात न घेतल्याने सद्यस्थितीत कुटुंब व्यवस्था कोलमडताना दिसत आहे. लोक विवाह समुपदेशकांची भेट घेऊन काडीमोड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही वेळ येऊ देण्याआधीच आपण कथा-कवितांमधून बोध घेत स्वतःचे विचार बदलले तर किती बरं होईल ना? त्यासाठी आपल्याला थोडेसे बालपणात डोकवावे लागेल. 

बालपणी आपण इसापनीतीच्या गोष्टी वाचल्या. बडबडगीतं म्हटली. पण त्यातून शिकलो काय? तर काहीच नाही! त्याचा गर्भितार्थ घेता आला असता तर काडीमोड होण्याची वेळ आली नसती. एवढा काय दडलंय त्यात? आज जागतिक चिमणी दिनानित्त अशाच एका बडबडगीतातून सुखी संसाराचा मंत्र शिकून घेऊया. पाहू या ते भावगीत -  

चिव चिव चिमणे, अग ए चिमणे काय रे चिमण्या हा बघ आणलाय मोत्याचा दाणा बघू बघू बघू, आहा... छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे?ठेवायचा कुठे? त्यात काय मोठे? बांधूया घरटे!हाsss! झाडाच्या फांदीवर, बांधूया छोटे घर, चला चला लवकर, काम करू भरभर!मी आणते कापूस, मी आणतो काड्या मी आणते गवत मी आणतो दोरा आतमध्ये छानदार कापूस मऊ कडेनी गवत पसरून देऊ गवताच्या कडेनं काड्या ठेऊ सगळी कडेनं दोऱ्यानं शिवू आतमध्ये छानदार पिलांना ठेवू पिले काय करतीलचाऱ्याशी खेळतील दाणा खातीलपाणी पितील गवताच्या गादीत कापसाच्या उशीत चिमुकली पिले राहतील खुशीत 

थोडक्यात जबाबदारीचं वाटप करून घेणं हेच सुखी संसाराचं गुपित आहे. चिमण्या जीवांना जर हे कळत असेल आपल्याला का बरं कळू नये? 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप