शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र; नियमितपणे जप करा, अद्भूत लाभ मिळवा, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:42 IST

Tirupati Balaji Most Impactful Mantra: तिरुपती बालाजी देवतेचा एक मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. या मंत्राचे लाभ आणि काही मान्यता जाणून घ्या...

Tirupati Balaji Most Impactful Mantra: भारतात संस्कृती आणि परंपरा यांना अतिशय अनन्य साधारण असे महत्त्व आहे. देशभरात हजारो मंदिरांमध्ये दररोज न चुकता पूजा, आराधना, नामस्मरण केले जाते. लाखो भाविक नित्यनेमाने मंदिरात जाऊन दर्शन घेतात. आराध्य देवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे पुण्य लाभदायी मानले गेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरे, मंदिरांचे स्थापत्य, कलाकुसर, कर्मठपणाने केले जाणारे पूजन, आरास यांची जगभरात चर्चा होत असते. असेच एक मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर.

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वांधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. वर्षाला कोट्यवधी भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात. कोट्यवधी रुपये दान केले जातात. तसेच या ठिकाणी केस अर्पण करण्याची प्रथा आहे. तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती. स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. 

तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र

तिरुपती बालाजी देवतेचे महात्म्य आणि त्याबाबतच्या मान्यता प्रचलित आहे. तिरुपती बालाजीचा असा एक प्रभावी मंत्र असल्याचे सांगितले जाते. या मंत्राचा नियमितपणे, दररोज न चुकता जप केल्यास याचे अद्भूत, चमत्कारिक फायदे अनुभवता येतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. हा मंत्र एक शुद्ध ध्वनी कंपन आहे, जो मनाला भ्रमापासून वाचवतो. या मंत्राचा सतत जप केल्याने हा मंत्र सकारात्मक ऊर्जा देतो. या मंत्राचा जप केल्यावर मन शांत होते आणि ध्यानस्थ होते. या मंत्राचे जप केल्याने मनाला आनंदाची अनुभूती होते, असे मानले जाते.  हे मनाच्या भावना शुद्ध करते आणि शरीरात चैतन्य निर्माण करते, असे सांगितले जाते. या मंत्राने भीतीची भावना कमी होते. सर्जनशील प्रक्रिया वाढते. मनातून नैराश्य दूर होण्यास मदत होते. मन शांत होण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते. हा मंत्र रोज ऐकल्याने आध्यात्मिक समृद्धीचा अनुभव येतो, अशी भाविकांची मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमःश्रीमन नारायण नमो नमःतिरुमल तिरुपति नमो नमःजय बालाजी नमो नमः

ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमःश्रीमन नारायण नमो नमःतिरुमल तिरुपति नमो नमःजय बालाजी नमो नमः

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटspiritualअध्यात्मिकPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३