सद्गुरुतत्त्व सदासर्वदा सगळीकडे एकाच वेळी उपलब्ध आहे. या ग्रंथिकेच्या रूपात ते स्वत:च उपदेश करत आहेत. त्यामुळे वाचक व वाचून साधनेला लागणारे साधक भाग्यवानच आहेत. पण असे असतानाही प्रत्यक्ष सद्गुरु भेटण्यापूर्वी निसर्गरूपी सद्गुरू प्रत्येकाला उपलब्ध आहे. दत्त गुरूंनीदेखील या चोवीस गुरूंकडून एक एक गुण घेतला. आपल्यालाही त्यांच्याकडून शिकण्यासारखे काय आहे ते पाहुया.
पृथ्वी : अपकार करणाऱ्यावरसुद्धा उपकार करणे.वृक्ष: तुमच्यापाशी येणाऱ्याला काही ना काही द्या.पर्वत : जगाला वाटण्यासाठी साठा करा.वारा : एके ठिकाणी फार काळ आसक्त होऊ नका.आकाश : शुद्धता, विचलित न होणारी शांतता धारण करा. विरोधकांनाही समान वागणुक द्या. जल : तुमच्यापाशी येणाऱ्याचे अज्ञान, मल साफ करून त्यांना प्रेम देऊन शांत आणि तृप्त करा.अग्नी : तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या गोष्टी स्वीकारा. ज्ञानाच्या उष्णतेने भस्म करा. चंद्र : कालगतीप्रमाणे सर्वांना उत्कर्ष, अपकर्ष अनुभवावा लागतो. तुम्ही स्वत: पूर्ण आहात. तुम्ही क्षय आणि वृद्धी या दोन्ही कला आत्मसात आहेत.सूर्य : तुमच्याकडे असणाऱ्या सर्व गुण संपत्तीचे विश्वस्त व्हा. त्यांच्याबद्दल जराही काळजी बाळगू नका. निष्कामपणे सेवा करत राहा.अजगर : दोन वेळच्या घासाची चिंता करून का.