शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Chaitra Navratra 2021 : चैत्रात गौरी माहेरी येते आणि अक्षय्यतृतीयेला सासरी परत जाते; वाचा हा आनंदसोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 10:02 IST

Chaitra Navratra 2021 : पूर्वी हळदीकुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना विरंगुळा मिळावा,ओळखी व्हाव्यात, ताणतणावातून थोडा विसावा मिळावा, घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आजही त्याच हेतूने हा समारंभ केला जातो.

महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळे आसन देऊन स्थापना करतात व  महिनाभर तिची पूजा करतात. त्यानिमित्ताने सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदीकुंकू समारंभ करतात. त्यावेळी घरी आलेल्या लेकी सुनांचे पाय धुतात. त्यांच्या हातांना थंडाव्याचे प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावून मग त्यावरून शिंपल्याचा वरचा शिरांचा भाग फिरवतात. यावेळी भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळासह ओटी भरतात. वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे हा या समारंभातील आतिथ्याचा एक भाग असतो. यावेळी 'गौरीचे माहेर' नावाचे एक गाणे आरतीत म्हटले जाते. चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते. सगळे कौतुकसोहळे करवून घेते आणि अक्षय्यतृतीयेला परत सासरी जाते, असे मानून सारे विधी केले जातात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर या सोहळ्याचे सुंदर वर्णन करतात...

चैत्रांगण : गौरीसमोर अथवा गौरीसाठथी घराबाहेरील अंगणात एका चौकोनात वेगवेगळ्या सुबक रांगोळ्या काढणे हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट असते. या रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात. या रांगोळ्या चंद्र, सूर्य, गोपद्म, कासव, हत्ती, तुळशीवृंदावन, फेर धरून नाचणाऱ्या मुली, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावले, राधाकृष्ण अशासारखे ठराविक विषय, प्रतीक म्हणून रेखाटल्या जातात. रोज सकाळी अंगण सारवून अशा रांगोळ्या काढून त्यांना हळद, कुंकू, फुले वाहतात.

चैत्रांगणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढण्याच्या प्रथेमुळे मुलींमधील, स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना प्रकट होण्यास वाव मिळतो. रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते. नेत्रदीपक रांगोळी रेखाटल्याचे स्त्रीमनाला समाधान मिळते. चैत्रांगण रेखाटताना तोच आनंद मनाला व्यापून टाकतो. वसंत ऋतूबरोबर बहरणारी चैत्रपालवी चैत्रांगणाच्या निमित्ताने स्त्रीमनालादेखील उल्हसित करावी, हा त्यामागता हेतू!

पूर्वी हळदीकुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना विरंगुळा मिळावा, समाजातील, गावातील इतर स्त्रियांशी परिचय व्हावा, ताणतणावातून थोडा विसावा मिळावा, नित्याच्या कामातून घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आता स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेरच्या जगात वावरत असल्या, तरी त्यांनाही अनेक व्याप ताप असतात. चिंता, काळजी असते. या चिंता, विवंचना काही काळ विसता याव्यात, तणाव हलके व्हावेत म्हणून आजही असे हळदीकुंकू समारंभ आवश्यक आहेत. अशा समारंभात सर्व स्तरातील स्त्रियांनी एकत्र आले पाहिजे. सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी देणारा हा चैत्र नवरात्रीचा आनंदसोहळा आहे.

चैत्रपालवी, चैत्रगौर, चैत्रांगण आणखीही बरेच काही दडले आहे या आल्हाददायी चैत्र मासात!

टॅग्स :Navratriनवरात्री