शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Ratha Saptami 2025: रथसप्तमीच्या आदल्या दिवशी ३ फेब्रुवारीला आठवणीने करा शेगडी पूजन; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:40 IST

Ratha Saptami 2025: यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, त्यानिमित्त या सणाशी आणि आपल्या स्वयंपाकघराशी निगडीत ही पुजा अवश्य करा, लाभच होईल!

माघ शुक्ल सप्तमीला 'रथसप्तमी' असे विशेष नाव आहे. या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेत अतिशय महत्त्व आहे.' ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी (Ratha Saptami 2025) आहे. व्रतासाठी ही सप्तमी अरुणोदयव्यापिनी घ्यावी' असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे.  या सप्तमीला आपल्याकडे रथसप्तमी असे नाव आहे. भारतात विविध प्रांतात ती जयंती सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणून गौरवले गेले आहे. सूर्यापासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. 

रथसप्तमी पूजेचा विधी 

व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वत:च्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. त्या चित्राचे 'ध्येय: सदा सवितृमंडल मध्यवर्ती' या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्त्रिायांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले. 

कालानुरूप बदल 

आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात. त्यावर मार्ग सुचवताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर धर्मबोध या ग्रंथात माहिती देतात- सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात स्नान करणे किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणे शक्य नाही. अशावेळी बादलीतील पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे. शुचिर्भूत झाल्यावर पाण्याने भरलेला नवीन टब किंवा परात गच्चीत नेऊन तिच्यामध्ये तेवता दिवा सोडावा. तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर वा झाडाच्या बुंध्याशी ठेवून प्रज्वलित करावा. 

पूर्वी 'चूल' अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणे शक्य होते.आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी आदल्या रात्री स्वच्छ धुऊनपुसून लख्ख करावी. सकाळी तिची पूजा करावी. नंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या वा पितळेच्या भांड्यात ही खीर शिजवावी. ब्राह्मणाला किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावे. कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर, पुऱ्या भाजी बरोबर घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्याव्यात. यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्त गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्घ्य देणे सर्वांनाच शक्य आहे. खीर करून तिचा नैवेद्या मात्र जरूर दाखवावा. रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोड खिरीसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे. हे कर्तव्यकर्म 'धर्म' म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे.

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी