शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

Rath Saptami 2025: मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीत का करावे मुलांचे बोरन्हाण? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:39 IST

Rath Sapatami 2025: प्रत्येक रुढी-परांपरेमागे पूर्वजांचे काही विचार आहेत, ते जाणून घेऊन कृती केल्यास नक्कीच आनंद द्विगुणित होईल!

मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. यंदा हा कालावधी १४ जानेवारी रोजी सुरू झाला असून ४ फेब्रुवारी पर्यन्त अर्थात रथसप्तमीपर्यंत असणार आहे. बोरन्हाण हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.

बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक, तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन्हाण घातले जाते. त्यात चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते.

बोरन्हाण घालताना लहानग्या उत्सवमूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो. मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. काळा रंग उष्णता शोषून घेतो. हिवाळ्यात शरीर उबदार राहावे, म्हणून आपण काळे कपडे वापरतो. त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या श्रुंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते.

या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो. तीळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते. गप्पा, गोष्टी, गाणी, नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात, आनंदात पार पडतो. या आठवणी आयुष्यभराच्या असतात.

ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुखावतो, त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीकडे व्हावे, यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे. यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाही. यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरात घडीभर आनंदाचा शिडकावा व्हावा, हीच या सोहळ्याची गंमत!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती