शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Rang Panchami 2024: एवढे रंग असूनही पांडुरंगाने काळाच रंग निवडण्यामागचे कारण जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:48 IST

Rang Panchami 2024: पांडुरंगाच्या रूपाची मोहिनी संतांनाही पडली, त्याचा रंग त्याच्या भक्तीत आड आला नाही, पण तोच रंग निवडण्याचं कारण स्तिमित करणारं आहे!

>> रोहन विजय उपळेकर

महाराष्ट्रामध्ये आज रंगोत्सव साजरा होतो. रंगांची उधळण करून लोक आपला आनंद व्यक्त करतात, एकमेकांना रंग लावून परस्परांमधील प्रेमभाव दृढ करतात. महाराष्ट्राचे कुलदैवत, आराध्यदैवत आहेत भगवान श्रीपांडुरंग. त्यांच्या नावातच ' रंग ' आहे. पण मजा म्हणजे, नाव आहे पांडुरंग, म्हणजे शुभ्रवर्णाचा आणि प्रत्यक्षात आहेत काळेकुट्ट ! गंमतच आहे सगळी.

संतांनी वर्णन केले आहे की ते निळे, सावळे दिसतात. काहीवेळा काळे दिसतात. या राजस सुकुमार नयनमनोहर रूपाचा खरा रंग कोणता मग?सर्व रंग हे तांबड्या पासून सुरू होऊन जांभळ्या रंगापर्यंत विभागलेले आहेत. सूर्य किरणाचे जलबिंदूमधून विकिरण होते तेव्हा हे सप्तरंग इंद्रधनुष्याच्या रूपाने पाहायला मिळतात. या सर्व रंगांचा मूळ रंग हा पांढरा आहे. एका पांढ-या रंगातून सर्व रंग निर्माण होतात. तसेच आमचे भगवान श्रीपंढरीनाथच सर्वांचे आद्य आहेत. सर्व देवदेवता, मनुष्यादी योनी, दिसणारे, भासणारे यच्चयावत् सर्व जग हे त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहे. म्हणूनही त्यांना आपण " पांडुरंग " म्हणू शकतो. 

आता हे सर्व रंग स्वत:चे वेगळेपण टाकून, बेमालूमपणे कोणत्या रंगात सामावतात? तर केवळ काळा रंगच तसा आहे. काळ्या रंगात इतर कोणताही रंग मिसळला तर तो एकरूप होऊन जातो. ( अपवाद फक्त पांढ-या रंगाचा आहे, पण तो तर त्यांचाच रंग आहे. ) तसे हे सर्व जग अंतिमत: त्या काळ्या श्रीविठ्ठलांमध्ये लय पावत असते. तेच काळाचेही महाकाळ आहेत. त्याचे द्योतक म्हणून  त्यांनी " काळा " हा रंग धारण केलेला आहे.श्रीसंत तुकाराम महाराज या भगवंतांचे स्वरूप सांगताना म्हणतात,

सकळ देवांचे दैवत ।उभे असे या रंगात ॥रंग लुटा माझे बाप ।शुध्द भावे खरे माप ॥रंग लुटिला बहुती ।शुक नारदादि संती ॥तुका लुटिताहे रंग ।साह्य झाला पांडुरंग ॥

श्रीतुकोबा सांगतात, जगाच्या रूपाने अनेक रंगांमध्ये अभिव्यक्त होणा-या या सकळ देवांच्याही आराध्य दैवताचा, भगवान श्रीपांडुरंगांचा भक्तिरंग जर लुटलात तरच खरी रंगपंचमी साजरी केल्यासारखे होईल. ज्याचा भाव जितका शुद्ध तितकेच कृपेचे माप त्याला प्राप्त होणार. पूर्वी शुकदेव, नारदादी संतांनी हा रंग अमाप लुटलेला आहे व आता श्रीपांडुरंगांच्या कृपेने सद्गुरूंच्याकडून ती युक्ती कळल्यामुळे तुकोबारायही तो भक्तिरंग भरभरून लुटत आहेत. खरी रंगपंचमी साजरी करीत आहेत व आपल्या सर्वांनाही आग्रहाने ही अलौकिक रंगपंचमी साजरी करण्यासाठी बोलावीत आहेत.

याच स्थितीचे वर्णन करताना, लौकिकार्थाने निरक्षर पण सद्गुरुकृपेने अद्भुत अनुभूती लाभलेल्या श्रीसंत सोयराबाई (श्रीसंत चोखामेळा महाराजांच्या पत्नी ) म्हणतात, "अवघा रंग एक जाला । रंगी रंगला श्रीरंग ॥" भक्त आणि भगवंत एकरूप होऊन गेले व त्या अलौकिक भक्तिरंगात दोघेही निरंतर रंगून राहिलेले आहेत. भक्ताला देवाचा चुकूनही विसर पडत नाही आणि देव भक्ताला क्षणासाठीही अंतर देत नाही, अशी अपूर्व प्रेमस्थिती होऊन गेलेली आहे. हीच खरी रंगपंचमी आहे व ती अनन्यभक्तीशिवाय साध्य होणार नाही. अनन्यभक्ती सद्गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नसते. यासाठीच माउली उपदेश करतात की, "म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे ।"

सर्वांना या अनंगरंगसागर भगवान श्रीपांडुरंगांच्या प्रेमरंगात निरंतर रंगून जाण्याचे, त्यांच्या भक्तिरंगाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य सप्रेम अनुभवण्याचे देवदुर्लभ सौभाग्य लाभो, हीच आजच्या या रंगपंचमीनिमित्त श्रीगुरुचरणी सादर प्रार्थना !!रंगपंचमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा  !!

संपर्क : 8888904481( http://rohanupalekar.blogspot.in )