शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Ramdas Navami 2022 : मृत्यूवर भाष्य करताना समर्थांनी किती थेट विचार मांडलेत बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 07:30 IST

Ramdas Navami 2022 : आपल्या मरणाने कोणाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं, तर ती आपली खरी कमाई. ते वैभव बघायला आपले डोळे उघडे नसतील, पण जमलेले लोक आपली श्रीमंती बघून नक्कीच हेवा करतील.

आज समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी, तिलाच दासनवमी असे म्हणतात. समर्थांनी आपले आयुष्य समाजकार्य आणि ईश्वरीकार्यासाठी वाहून घेतले. विपुल लिखाण केले. तरुणांना मार्गदर्शन केले. लोकांमध्ये स्वदेश, स्वधर्माची जागृती केली आणि छत्रपती शिवरायांनी आनंदभुवन प्रस्थापित केलेले पाहून अत्यंत संतोषाने माघ वद्य नवमीला सज्जनगड येथे देह ठेवला. त्यांच्या जाण्यापूर्वी त्यांचे शिष्य व्याकुळ झाले. त्यांना उद्देशून समर्थ मनाच्या श्लोकांची आठवण करून देतात, 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।अकस्मात  तोहि पुढे जात आह ।पुरेना मनी लोभ रे क्षोभ त्याते ।म्हणोनी जनी मागता जन्म घेते।

समर्थ लिहितात आज एक जण गेला आणि त्याच्या शोकात काळ पुढे सरकत राहिला आणि कालौघात शोक करणाराही गेला. नव्हे तो आज ना उद्या जाणारच आहे. परंतु जाण्याआधी त्याने कार्य काय केले ते पाहणे महत्त्वाचे ठरते. म्हणून शोकात बुडून जाण्यापेक्षा लोभ सोडावा आणि कार्यपूर्तता करावी. 

मृत्यू, एक अटळ घटना. जी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारच आहे, तरी आपण ती स्वीकारत नाही. उलट मरणाच्या भीतीने बऱ्याचदा जगणं सोडून देतो. याउलट जे लोक प्रत्येक दिवस शेवटचा असं समजून जगतात, ते आयुष्याचा भरभरून आनंद घेतात.

अर्थात, हे तत्वज्ञान वाचायला सोपं आणि जगायला कठीण आहे. नीट विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की आपण स्वतःच्या मृत्यूला जितके घाबरत नाही, तितके आपल्या आप्त जनांच्या मृत्यूला घाबरतो. त्यांच्या नंतर आपलं काय, हा विचार जास्त क्लेशदायक असतो. पण दुःखाचा आवेग ओसरला, की आयुष्य पूर्व पदावर येतं आणि पुढे मागे आपणही या प्रवासाचे प्रवासी होतो.

आपला मृत्यू आपण स्वीकारला नाही, तरी तो येणारच आहे, कधी ते माहीत नाही, पण येणार हे नक्की! ज्योतिष असो वा विज्ञान मृत्यूची पूर्वकल्पना देऊ शकत नाही. अशात आपल्या हाती राहतं, ते जीवनाचा भरभरून आस्वाद घेणं. दुःखं, संकटं येतच राहणार, वाईट घटना घडतच राहणार, पण खरा कस तेव्हा लागतो, जेव्हा आपण सहजतेने त्यांचा स्वीकार करतो. नव्हे, तो करावाच लागतो.

प्रत्येक कलाकार कार्यक्रमाआधी आपले सादरीकरण कसे होईल याचा पूर्व विचार करतो आणि त्यादृष्टीने तयारी करतो. तशी तयारी या शेवटच्या कार्यक्रमाची आपण केली पाहिजे. शेवटचा शो हिट झाला पाहिजे, असं वाटत असेल, तर संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचावं लागतं. 

अंत्य यात्रेत किती गर्दी होती, यावरून गेलेल्या व्यक्तीची लोकप्रियता कळते. आता आपल्या वेळी किती डोकी जमतील, याचा हिशोब आपण करायला हवा. जसा कठीण पेपर गेल्यावर किमान पास होण्यापूरते मार्क आपल्याला मिळतील की नाही, याचा आपण हिशोब करतो, अगदी तसा! म्हणजे उर्वरित पेपरवर चांगला जोर मारता येतो. 

आपल्या पश्चात कोणी चांगलं बोललं नाही, तरी चालेल, पण कोणी वाईट बोलता कामा नये, यासाठी आपली वागणूक आतापासून सुधारायला हवी. अशा वेळी बाबांचा मंत्र आठवतो, कोणी मित्र नसलं तरी चालेल, पण एकही शत्रू नको! मनुष्य चांगल्या चारित्र्याचे सर्टिफिकेट लोकांकडून मिळावे, यासाठीच आयुष्यभर खस्ता खात असतो. 

आपण जे कमावतो, त्यापैकी आपल्या सोबत काहीच येणार नाही. हे सत्य स्वीकारून उर्वरित आयुष्यात लोकांसाठी किती आणि स्वतः साठी किती जगायचं, याचं गुणोत्तर ठरवायला हवं. आपल्या पश्चात आपण लोकांकडे फक्त चांगल्या आठवणींचा ठेवा देऊन जाऊ शकतो. बाकी गोष्टी चेक इन होताना यमराज काढून घेतात. त्यामुळे अपेक्षांचं लगेज वेळीच कमी केलेलं बरं!

लिहिण्यासारखं काहीतरी करून जा किंवा जाण्यापूर्वी काहीतरी लिहून जा, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. यापैकी आपली कॅटेगरी लक्षात ठेवून कामाला लागायला हवं. 

आपल्या मरणाने कोणाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं, तर ती आपली खरी कमाई. ते वैभव बघायला आपले डोळे उघडे नसतील, पण जमलेले लोक आपली श्रीमंती बघून नक्कीच हेवा करतील. प्रत्येकाला जायचं तर आहेच, मग मरेपर्यंत दिलखुलास जगा आणि जगू द्या!

यासाठी समर्थांनी केलेला बोध अर्थात दासबोध, मनाचे श्लोक यातून जीवनाचे सार समजून घेऊया आणि समर्थांचे स्मरण करून कार्यारंभ करूया.