शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Vasubaras 2024: धनागमन, धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य देणारे आजचे रमा एकादशी व्रत कसे करावे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 10:03 IST

Rama Ekadashi 2024: आजपासून दिवाळी सुरु झाली. दिवाळी संपेपर्यंत सर्वांनी एक पथ्य आवर्जून पाळायचे आहे, कोणते? ते जाणून घ्या; लाभच होईल!

धनत्रयोदयशीपासून दिवाळी (Diwali 2024) सुरु झाली असे अनेकांना वाटते. त्यात काही जण तर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज यांनाच दिवाळीचे मुख्य सण मानतात. मात्र खरी दिवाळी सुरु झाली ती आजपासून अर्थात २८ ऑक्टोबर पासून. रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस (Vasu baras 2024) हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. पाठोपाठ २९ ला धनत्रयोदशी (Dhan Teras 2024), ३१ ला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024), १ नोव्हेंबर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024),  २ ला पाडवा (Bali Pratipada 2024) आणि ३ ला भाऊबीज (Bhai Dooj 2024) असणार आहे. अनेक जण कोजागिरीपासून कंदील आणि रोषणाई सुरु करतात. ज्यांच्या घरी तसे केले जात नाही, त्यांनी निदान वसुबारसेपासून दिवाळी साजरी करायला हवी. या प्रत्येक सणाची माहिती आपण वेळोवेळी घेणारच आहोत. तूर्तास आज रमा एकादशी (Rama Ekadashi 2024)आणि वसुबारस याचे महत्त्व, उपासना आणि लाभ याबद्दल जाणून घेणार आहोत पालघरचे ज्योतिष अभ्यासक सचिन मधुकर परांजपे यांच्याकडून!

“दिपावली” ची सुरुवात आपण वसुबारसेपासून करतो. यावर्षी दिनांक २८ ऑक्टोबर सोमवारी रोजी एकादशी आणि वसुबारस एकत्र आले आहेत. या महिन्यात येणार्‍या (अश्विन) कृष्ण एकादशीला “रमा एकादशी” म्हणून संबोधतात. श्रीविष्णु आणि श्रीलक्ष्मीदेवी यांच्यातील अद्वैत किंवा तादात्म्यता दर्शविणारी ही एक महत्त्वाची एकादशी आहे हे व्रतस्थ साधकांनी आवर्जून लक्षात घेणे.

रमा एकादशी ही धनागमन, धनलाभ आणि आलेले पैसे स्थिर करणारी मानली जाते. दिवाळीत जे तांत्रिक धनसाधना करतात ते रमा एकादशीला खूप मानतात. “रमा एकादशी ते लक्ष्मीपूजन” हा काळ तांत्रिक लक्ष्मीसाधनेसाठी फार महत्वाचा असतो. एक तांत्रिक मला एकदा म्हणाला होता “भाई, रमा एकादस के दिन भगवान विष्णुजी के लिये कुछ उपवास तप करेंगे तो वोह घर आते है...फिर उनके पिछे पिछे काली चौदस को माता आवेगी”

तर ही एकादशी अजिबात चुकवू नका. सोमवार दिनांक २८ ते मंगळवार २९ दुपारी भोजनापर्यंत व्रतस्थ रहा. सोमवारी दोन्ही वेळ उपवास, विष्णुसहस्त्रनाम, विष्णुमंत्र जप करा...विशेषतः कर्जाचे टेन्शन असणारे, आर्थिक अडचणी असणाऱ्यांनी आवर्जून करा....

विशेष सूचना - २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर” दारुच्या थेंबालाही स्पर्श करु नका आणि कसलाही व्यभिचार करु नका!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४