शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan 2023: नारळी पौर्णिमेला सागराची तसेच रामाची पूजा करण्यामागे आहे 'ही' रामकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:00 IST

Raksha Bandhan 2023: 'वल्हव रे नाखवा' म्हणणारे नाविक नारळी पौर्णिमेला सागराप्रती ऋणनिर्देश म्हणत रामाला साद घालतात वल्हव रे रामाऽऽ; वाचा ही रामकथा!

यंदा ३० ऑगस्ट रोजी म्हणजे येत्या बुधवारी नारळी पौर्णिमा आहे. त्यादिवशी समस्त कोळीबांधव सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात आणि पावसामुळे स्थगित झालेला मासेमारीचा व्यवसाय पुन्हा सुरू करतात. लाटांवर स्वार होत ते रामाला साद घालतात, `वल्हव रे नाखवा होऽऽ वल्हव रे रामाऽऽ'

तुम्ही म्हणाल, हे तर लतादीदींनी गायलेले सुप्रसिद्ध गीत आहे. त्याचा आणि रामायणाचा काय संबंध? कोळीबांधव नाव वल्हवत रामा होऽऽऽ म्हणत जी साद घालतात किंवा बंगालमध्ये `ओ माजी रेऽऽऽ' म्हणतात, ती रामायणातल्या रामाला असते का? हे सगळे काही आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला रामायणात डोकवावे लागेल. 

राजा दशरथाला अर्थात आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी रामचंद्र, सीता माई आणि लक्ष्मण सर्व संग परित्याग करून वल्कले नेसून दंडकारण्यात जायला निघाले. सुमंतांनी त्या तिघांना गंगाघाटापर्यंत आणून सोडले. तिथून पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता. परंतु वाटेत विस्तीर्ण गंगा नदी होती. तिचे विशाल पात्र पार करून जायचे, तर नावेची गरज लागणार होती. त्यावेळेस समस्त नावाडी रामसेवेसाठी उपस्थित होते. परंतु रामप्रभुंना कोणाकडूनही सेवा घ्यायची नव्हती. मात्र सूर्यास्त होण्याआधी गंगेचे पात्र ओलांडून पलीकडे जायचे होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नावेची सेवा घ्यावी लागली.

त्यावेळेस नावाड्यांचा प्रमुख गुहक नावाडी रामसेवेसाठी पुढे आला आणि त्याने रामचरणांची पाद्यपूजा करून त्यांना आपल्या नावेत घेतले. नाव वल्हवत दुसऱ्या तीरापर्यंत आणली. परंतु राम उतरायला तयार होईना. फुकट सेवा घ्यायची नाही, असे ठरवले असतानाही सेवा घेतली होती, पण मोबदला काय द्यायचा ही विवंचना रामप्रभूंना त्रस्त करत होती. त्यावेळेस सीतामार्इंनी रामरायाला आपल्या साखरपुड्याच्या अंगठीकडे लक्ष वेधत खुणेनेच विचारले, `ही अंगठी दिली तर चालेल का?'

आपल्यावर आलेला मानहानीचा प्रसंग आपल्या पत्नीने न बोलता सोडवला हे पाहून रामप्रभूंना तिचे कौतुक वाटले. त्यांनी ती मुद्रिका अर्थात अंगठी गुहक नावड्याला देऊ केली, तेव्हा गुहक नावाडी म्हणाला, 

'रामप्रभू, तुम्ही आम्ही एकाच बिरादरीचे! मी गंगेचा नावाडी, तुम्ही भवसागर पार करून नेणारे नावाडी. एकाच व्यवसायातल्या दोन व्यावसायिकांनी परस्परांशी व्यवहार करायचा नसतो. हे नितीला धरून नाही!' हे गुहक नावड्याचे बोलणे नसून हा भक्त भगवंतामधला संवाद होता. लक्ष्मण आणि सीतामाई आश्चर्याने पाहत होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्र गुहकाला म्हणतात, `अंगठी देऊ नको म्हणतोस, मग मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ तरी कसा?'

त्यावेळेस गुहक नावड्याने सांगितले, 'प्रभू रामा, तुझी नौका मी एका तीरावरून दुसऱ्या तीराला लावली, तशी आम्हा कोळीबांधवांची जीवननौका तू पैरतीराला लाव! आम्ही समुद्रात स्वत:ला झोकून देतो. ते तुझ्या भरवशावरच. आमच्या प्राणांच्या रक्षणाची ग्वाही दे!'

हे ऐकल्यावर रामचंद्रांनी तथास्तु म्हणत गुहकाला आश्वस्त केले आणि केवळ गुहकाचाच नाही, तर समस्त कोळीबांधवांचा रामरायाने उद्धार केला....म्हणून आजही समुद्रात नाव वल्हवताना कोळीबांधव रामाचा गजर करत स्वत:ला झोकून देतात....वल्हव रे नाखवा होऽऽऽ वल्हव रे रामाऽऽऽ!

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनramayanरामायण