शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

युद्धाची तयारी शांततेत करा; काही काळासाठी 'नॉट रिचेबल'व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:28 IST

यशस्वी होण्यासाठी सतत लोकांसमोर राहणे गरजेचे नाही, काही काळ एकांतात घालवून आयुष्याची आखणी करणेही महत्त्वाचे असते!

आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी ऐन वेळेवर सुचतात. एवढेच काय, तर परीक्षेत पेपरचे तीन तास संपत आले की शेवटच्या पाच मिनीटात आपली ज्ञानगंगा दुथडी भरून वाहू लागते. पण तेव्हा फार उशीर झालेला असता़े बरेच काही येऊनसुद्धा, आठवूनसुद्धा पेपर हिसकावून घेतला जातो. परंतु, शालेय परीक्षा परत देता येईलही, मात्र आयुष्यातल्या परीक्षेत नापास झालो, तर वारंवार संधी मिळत नाही. म्हणून युद्ध सुरू झाले, की तयारी करू ही वृत्ती सोडून शांततेच्या काळात युद्ध कधीही झाले तरी आपण शस्त्रसज्ज कसे असू यावर भर दिला पाहिजे. अर्थात संकटांशी लढण्याची सर्वतोपरी तयारी केली पाहिजे. 

एक शेतकरी होता. तो वयोवृद्ध होता. त्याला शेतकामासाठी मजूर हवे होते. तो त्यांना चांगला पगार द्यायलाही कबूल होता. परंतु त्याचे शेत अशा ठिकाणी होते, जिथे सतत वादळसदृश्य परिस्थिती असे. त्यामुळे कितीही मेहनत केली, तरी त्यावर पाणी फिरत असे. ही बाब लक्षात घेऊन अनेक मजूरांनी तिथले काम अर्धवट सोडले होते.

शेतकऱ्याला मात्र जमीन वाऱ्यावर टाकून चालणार नव्हते. त्याने वर्तमानपत्रात बातमी दिली आणि कामासाठी होतकरू तरुण हवा आहे, योग्य मोबदला दिला जाईल असे म्हटले. बातमी वाचून एक गरजू तरुण शेतकऱ्याला येऊन भेटला. शेतकऱ्याने आधीच परिस्थितीचे वर्णन करून सांगितले. यावर तरुण म्हणाला, `हरकत नाही, मी काम करायला तयार आहे. फक्त माझी एक अडचण आहे. वाऱ्याची झुळूक आली, की मला गाढ झोप लागते. एरव्ही मी सतर्क असतो. तुमच्या कामात मी अडचण येऊ देणार नाही, तुम्ही माझ्या झोपेत अडचण येऊ देऊ नका.'

शेतकऱ्याने त्याला संधी द्यायचे ठरवले. तरुण मुलगा मन लावून काम करत होता. एक दिवस वादळ आले. शेतकरी लगबगीने तरुणाला बोलवायला गेला. तर तरुण गाढ झोपला होता. शेतकरी त्याला गदागदा हलवून उठवत होता. तरुण म्हणाला, माझी अट विसरलात का बुवा?'

`याला नंतर बघून घेतो, आधी माझे शेत पाहतो' असे म्हणत शेतकरी रागारागात शेतावर गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, सगळ्या पिकांची व्यवस्थित बांधणी केली होती. कोंबड्यांना नीट झाकून ठेवले होते. कोठाराचे दार घट्ट बंद केले होते. ते पाहून शेतकऱ्याला तरुणाचे बोल आठवले, `वारा आला की झोप लागते' याचा अर्थ त्याला परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने संकटाआधीच बचावाची पूर्वतयारी करून ठेवली होती. शेतकरी त्याच्यावर खुष झाला आणि त्याला दुप्पट पगार बक्षीस म्हणून दिला. 

आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी, बचावकार्य आधीच करून ठेवले, तर संकटाला तोंड देणे किती सोपे होईल नाही? तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी