शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:33 IST

Premanand Maharaj Big Comment On Air India Plane Crash Incident: एअर इंडिया विमान अपघाताबाबत प्रेमानंद महाराजांचे विधान आणि केलेला उपदेश महत्त्वाचा मानला जात आहे.

Premanand Maharaj Big Comment On Air India Plane Crash Incident: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. यावर प्रेमानंद महाराज यांनी एक गोष्ट सांगितली आहे. ही गोष्ट आपणही ध्यानात ठेवायला हवी.

अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातानंतर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्र आणि अध्यात्मिक पातळीवर अनेक चर्चा झाल्या. एवढा प्रचंड प्रमाणावरील भीषण अपघात झाला. प्रवाशांच्या अस्तीही शिल्लक राहिल्या नाहीत. परंतु, बाळकृष्णाची मूर्ती आणि श्रीमद भगवद्गीतेची प्रत यांना अखंड राहिली. या दोन्ही गोष्टींना काहीही झाले नाही. या गोष्टीची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. प्रेमानंद महाराज यांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रेमानंद महाराजांचे सोशल मीडियावर लाखो अनुयायी आहेत. प्रेमानंद महाराजांची शिकवण, बोध, सल्ले हेही व्हायरल होत असतात. अनेक बडे संत-महंत तसेच सेलिब्रिटी प्रेमानंद महारांच्या दर्शनासाठी जात असतात. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जातात. यावेळी प्रेमानंद महाराजांनी केलेली चर्चा अनेकांना मार्गदर्शक ठरते, असे म्हटले जाते. एअर इंडिया विमान अपघात झाल्यावर प्रेमानंद महाराजांना भेटायला गेलेल्या एका भाविकाने या भीषण घटनेबाबत विचारले.

व्हायरल व्हिडिओत प्रेमानंद महाराज एअर इंडिया विमान अपघाताबाबत काय म्हणतात?

प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक भक्त त्यांना विचारत आहे की, हा विमान अपघात कसा झाला? प्रेमानंद महाराज उत्तर देत आहेत की, तुम्ही विचार करा की, एक जिवंत माणसाला आगीच्या भक्षस्थानी जात असताना काय वाटले असेल? त्याला किती वेदना झाल्या असतील. तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवून पाहा. जिवंतपणे आणि सर्व घटनांची जाणीव असताना जळून मृत्यू होणे खूप वाईट आहे. जिवंतपणी जळणे हे भयानक वेदनादायी आहे. हे कोणाच्याही बाबतीत घडू शकते. हे आपल्या बाबतीतही घडू शकते. आपणही अपघाताचे बळी ठरू शकतो. म्हणूनच, भगवंताला नेहमीच शरण जा. देवाच्या शरणात राहा. शक्य तितके देवाचे नाव घ्यावे. नामस्मरण करावे. कारण येथून सर्व काही कधी नष्ट होईल हे कोणालाही माहिती नाही. तुम्ही आरामात रस्त्यावरून जात आहात आणि अचानक एक गाडी आली आणि तुम्हाला चिरडून निघून गेली. अशा अनेक घटना घडल्या आहेत, असे प्रेमानंद महाराज त्या व्हिडिओत सांगताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, एका दीपावली विशेषांकाचा एक फोटो व्हायरल होत असून, यामध्ये जून २०२५ चे भविष्य देण्यात आले आहे. हे भविष्य वाचल्यावर अनेक जण ज्योतिषशास्त्रांच्या अंदाजांवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यामध्ये म्हटले होते की, शनि मंगळाचा षडाष्टक योग मोठ्या युद्धासाठी पोषक असून, काही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतील. या योगामुळे मोठे अपघात/घातपात/अतिरेकी कारवाया/गूढ मृत्यू यामधून मोठी हानी संभवते. मोठे विमान अपघात किंवा हवाई हल्ले यातून मोठी हानी संभवते. क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकAir Indiaएअर इंडियाTataटाटाPlane Crashविमान दुर्घटना