शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:26 IST

Pitru Paksha 2025 Rituals in Marathi: यावेळी ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, मात्र सुरुवात आणि शेवट ग्रहण असल्याने श्राद्धविधीमध्ये काही बदलक केले पाहिजे ते जाणून घ्या. 

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत अर्थात सर्वपित्री अमावास्येपर्यंत(Sarva Pitru Amavasya 2025), पितृपक्षात (Pitru Paksha 2025) पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते. यावर्षी ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी(Pitru Paksha date 2025) असणार आहे. परंतु एकाच पंधरवड्यात दोन ग्रहण असल्याने श्राद्धविधीवर त्याचा परिणाम होणार का? ते दिवस निषिद्ध ठरणार का? ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतो. या १५ दिवसांत पितर पृथ्वीवर येतात. म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करतात. यावर्षी ८ ते २१ सप्टेंबर पर्यंत हा कालावधी असेल.

Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!

चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2025): 

पितृपक्ष सुरु होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला, रविवारी ७ सप्टेंबरला चंद्रग्रहण (Chandra Grahan) असणार आहे, जे भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील वैध असेल. चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. पौर्णिमा तिथी रात्री ११.३८ मिनिटांनी संपेल, नंतर प्रतिपदा सुरु झाली तरी ती ८ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालयारंभ सोमवारपासूनच होईल. दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय ११, १४, १५,१८, २१ यापैकी कोणत्याही दिवशी करावे. 

सूर्यग्रहण (Solar Eclipse 2025): 

यानंतर, २१ सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण (Surya Grahan) भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला (Sarva Pitru Amavasya Date 2025) श्राद्धविधी आणि दानधर्म करावे. 

सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2025) : 

पितृपक्षाचा काळ पितरांच्या आशीर्वाद घेण्याचा मानला जातो. मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्धतिथी माहीत नसते, तरीदेखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते. अशा भाविकांसाठी सर्वपित्री ही तिथी राखीव ठेवली आहे. त्यानुसार रविवार २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्यादिवशी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येतील. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLunar Eclipseचंद्रग्रहणsolar eclipseसूर्यग्रहण