शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:48 IST

Pitru Paksha 2025 Shraddha Rituals: ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष आहे, याकाळात पितरांचे श्राद्धविधी करून त्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचला हे कसे ओळखावे ते पहा.

Pitru Paksha Matsya Purana: मत्स्यपुराणात श्राद्धासंबंधी एक प्रश्न उपस्थित केला आहे, तो असा की, ब्राह्मणाने खाल्लेले किंवा होमाग्नीत अर्पण केलेले अन्न मृतात्म्यांना कसे पोहोचते? कारण मृत्यूनंतर ते आत्मे पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या देहात आश्रय घेतात. या प्रश्नाचे उत्तरही तिथेच आहे. ते असे-

वसु, रुद्र व आदित्य या पितृदेवतांच्या द्वारे ते पितरांना पावते किंवा त्या अन्नाचे भिन्न पदार्थात, म्हणजे अमृत, तृण, भोग, हवा इ. पदार्थात रूपांतर होऊन पितर ज्या योनीत असतील, त्या योनीत त्या त्या रूपाने वरील देवतांद्वारे अन्न पोहोचते. म्हणजे स्वर्गात देवरूप असल्यास अमृताने, अंतरिक्षात गंधर्वरूप असल्यास भोगाने, पशुयोनीत असल्यास जलाने, दानव योनीत असल्यास मांसाने, प्रेतरूप असल्यास रक्ताने व मान असल्यास अन्नरूपाने अन्न मिळते.

Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!

श्राद्धाच्या वेळी योगी, सिद्धपुरुष व देव हे भिन्न रूपे घेऊन पृथ्वीवर हिंडत असतात व ब्राह्मणाच्या रूपाने श्राद्धविधीचे निरीक्षण करायला येतात, असे वायु, वराह व विष्णु पुराणात सांगितले आहे. त्याचप्रमाणे श्राद्धाच्या वेळी योगी व संन्यासी याला भोजन दिल्यास, पितर अत्यंत तृप्त होतात, असे मार्कंडेय पुराणात सांगितले आहे. 

थोडक्यात, आपण अनन्यभावे शरण जाऊन जसा देवाला नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे देवरूप झालेल्या पितरांना दाखवलेला नैवेद्य येनकेनप्रकारेण अर्थात कोणत्याही मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचतो. केवळ त्यासाठी नैवेद्य अर्पण करतानाचा भाव शुद्ध हवा. हा नैवेद्य पितरांना अर्पण करत आहोत ही भावना हवी. केवळ उपचार म्हणून ठेवलेले पान कावळाही शिवत नाही. आपली सेवा पितरांनी स्वीकारावी ही मनात भावना असेल, तर सुक्ष्म जीवजंतूपासून थेट घारीपर्यंत कोणत्याही रूपाने येऊन पितर त्या नैवेद्याचा स्वीकार करतात. 

बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

यासाठीच मनात कोणतेही द्वंद्व न ठेवता, आपल्या पूर्वजांच्या ऋणात राहून आपल्या घासातला घास आठवणीने त्यांच्यासाठी काढून ठेवणे, ही खरी श्रद्धा आणि ती असेल तरच हातून घडलेला विधी म्हणजे श्राद्ध!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण