शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Pitru Paksha 2024: अविधवा नवमी तिथी का महत्त्वाची? त्या तिथीला कोणाचे श्राद्धविधी करावेत? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:00 IST

PItru Paksha 2024: यंदा २५ सप्टेंबर रोजी अविधवा नवमी श्राद्ध आहे, ते कोणी, कधी व कसे करावे ते जाणून घ्या!

पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, त्या स्त्रिसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वणाविधीने अविधवानवमीश्राद्ध' करण्याविषयी शास्त्राज्ञा आहे. यावर्षी ही तिथी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी येत आहे. वाचूया सविस्तर माहिती. 

अवेहपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना 'सधवा' म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो, तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा 'सधवा' हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवानवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. 

जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल, तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवानवमीचे श्राद्ध, म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल, तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत: करावे. 

अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत :

या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालतात. तिला सौभाग्य अलंकार देतात. यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात. तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात.

अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण :

साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो. मात्र, संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिच्या इच्छा आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून राहते.  तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी, म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एकार्थी स्त्रिच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली, तरीदेखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीदेखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे. यातून लक्षात येते, की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे. त्यांना दुषणे देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृद्धींगत करण्यात धन्यता मानुया!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३