शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Pitru Paksha 2024: पितरांच्या तिथीनुसारच करा श्राद्धविधी, होईल अपार लाभ; पण तिथी माहीत नसेल तर? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 07:00 IST

Pitru Paksha 2024: आजपासून २ ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष; या काळात पितरांच्या तिथिनुसार श्राद्ध केल्याने लाभ होतात, पण तिथी माहीत नसेल तर काय करावे ते वाचा!

मनुष्यमात्रावर देव, ऋषि, पितृ यांची अशी तीन ऋणे असतात. यापैकी श्राद्ध करून आपण पितृऋण फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आपल्याला आयुरारोग्याच्या आणि सुख सौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणातून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ जीवन जगलो असा अर्थ होतो.

पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असे नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मुख्यतिथीला, सर्वात सहज प्राप्त होणाऱ्या जल, तीळ, तांंदूळ, कुश आणि फुले यांनी श्राद्ध करता येते. एवढे केल्याने आपल्यावरचा पितृऋणभार हलका होतो. यासाठी अनादि कालापासून चालत आलेला हा श्राद्धविधी आहे. श्राद्ध केल्याने कोणती फलप्राप्ती होते, याविषयी स्मृतिचंद्रिकेत एक श्लोक आहे -

आयु: पुत्रान् यश: स्वर्ग कीर्तिं पुष्टिं बलं श्रिय:पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात पितृपूजनात् ।।

आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने, म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात. म्हणजे पितरांच्या संतुष्टतेने श्राद्धकर्त्याचा विकास होतो. त्यातही श्राद्धविधीचे तिथीनुसार मिळणारे फळ धर्मशास्त्रात दिले आहे. ते पुढीलप्रमाणे-

प्रतिपदा - उत्तम पुत्र, पशु वगैरेची प्राप्तीद्वितीया - कन्या, संपत्तीतृतीया - अश्वप्राप्ती (आजच्या गाळात यशाची घोडदौड असा अर्थ घेता येईल)चतुर्थी - पशुधन, खाजगी वाहन, सुबत्तापंचमी - मुलांचे यशषष्ठी - तेजस्वी संतानसप्तमी - शेती, जमीनीची प्राप्ती, लाभअष्टमी - व्यापारात लाभनवमी - नोकरी उद्योगात भरभराटदशमी - सुबत्ता, वैभवएकादशी - ऐहिक सुखाचा लाभद्वादशी - सुवर्णलाभत्रयोदशी - पद, प्रतिष्ठाचतुर्दशी - सर्वसामान्य समाधानी जीवनअमावस्या - सर्व इच्छांची पूर्ती

चतुर्दशी तिथी वगळता दशमीपासूनच्या तिथी श्राद्धकर्मास प्रशस्त मानल्या आहेत. या सर्व तिथी वद्य पक्षातील असून पक्षपंधरवड्यात विशेष फळ देणाऱ्या आहेत. वरील लाभांची यादी वाचली की लक्षात येईल, एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पितरांना सद्गती देणारी नाही, तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारी आहे. ज्यांना पितरांची तिथी माहीत नाही वा लक्षात नाही, त्यांनी सर्वपित्री आमवस्येला श्राद्धविधी करावेत असे शास्त्र सांगते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३