शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2022: श्राद्धविधीची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली याचे उत्तर ब्रह्माण्डपुराणात दिले आहे; सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 10:56 IST

Pitru Paksha 2022: सालाबादप्रमाणे पितृपक्षात आपण श्राद्धविधी करतो, पण याची सुरुवात नेमकी कोणी व कधी केली याची आपल्याला उत्सुकता असते, त्याची सविस्तर माहिती!

पितरांना संतुष्ट करण्यासाठी केलेला विधी म्हणजे श्राद्ध! श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निष्पन्न झाला आहे. ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध प्रकरणात श्राद्धाची व्याख्या दिली आहे, ती अशी-

देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्पितृनुद्दिध्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धुदाहृतम् 

याचा अर्थ असा, की देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा व विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून केलेले दान याला श्राद्ध म्हणावे. ते कोणी व कधी निर्माण केले याची माहिती ब्रह्मांडपुराणात मिळते.

श्राद्ध विधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिमुनी यांची आहे. त्यांच्या वंशात दत्तात्रेय झाला. त्याचा पुत्र निमी, त्याचा पुत्र श्रीमान. श्रीमानाने सहस्त्र वर्षे तप केल्यानंतर कालधर्मास अनुसरून तो मरण पावला. तेव्हा निमीने पुत्राचे यथाविधी उत्तरकार्य केले. पण पित्यासाठी सांगितलेला विधी पुत्राकडे लावला, म्हणून निमीपुढे प्रश्न उभा राहिला, की हा नवीन प्रकार काढून आपण धर्मसंकर तर केला नाही ना? असे मनात येताच त्याला वाईट वाटले. 

Pitru Paksha 2022 : कावळ्यांच्या रूपात पितरांना आपण जेवायला बोलवतो, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना असतील? याचा मागोवा!

पूर्वी ऋषीमुनींनी आचरलेली गोष्ट केली असती, तरी त्याच्या मनास चैन पडेना. तेव्हा त्याने आपला मूळ पुरुष जो अत्रि, त्याचे स्मरण केले. स्मरण करताच अत्रिमुनि तेथे आला व त्याने निमी पुत्रशोकाने कृश झाला, हे पाहून गोष शब्दांनी त्याचे सांत्वन केले. `निमी तू जो श्राद्धविधी योजलास, तो म्हणजे ब्रह्मदेवाने घालून दिलेला धर्मविधीच होय आणि त्याचेच तू आचरण केले आहेस. आता मी तुला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगतो.' असे सांगून त्याने श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे.

श्राद्धप्रथा ही फार प्राचीन आहे. पितरांच्या, म्हणजे मृतात्म्यांच्या ठायी पुढीलांचे भले बुरे करण्याचे सामर्थ्य असते, या कल्पनेतून श्राद्ध कल्पनेचा उगम झाला. वैदिक वाङमयात पितर हा शब्द पिता, पितामह व प्रपितामह म्हणजेच वडील, आजोबा व पणजोबा या अर्थाने वापरला जातो. मनूने सर्वप्रथ श्राद्धक्रिया सुरू केली, असे ब्रह्मांडपुराणात म्हटले आहे. म्हणूनच विष्णू व वायु पुराणाध्ये मनूला श्राद्धदेव म्हटले आहे. प्राचीन काळी श्राद्धाला पिंड पितृयज्ञ हे नाव होते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष