शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Pitru Paksha 2022: यंदा महालयारंभ कधीपासून होणार? महालय आणि श्राद्ध यातील मुख्य फरक जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:06 IST

Pitru Paksha 2022: महालय ज्याला आपण पितृपक्षसुद्धा म्हणतो, त्याची सुरुवात यंदा १० सप्टेंबरपासून होणार असून या पंधरवड्याचे महत्त्व जाणून घ्या.  

गणपती आणि नवरात्र यांच्या मधला काळ महालयाचा असतो. गणेशोत्सवाचा आनंद ओसरल्यावर पितरांचा आठव करावा, त्यांचे पूजन करावे आणि परत नव्या उत्साहाने नवरात्रोत्सवाचा आनंद लुटावा, अशी आपल्या संस्कृतीची सुंदर रचना आहे. यंदा महालयारंभ १० सप्टेंबर रोजी होणार असून २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarvapitri Amavasya 2022) आहे. या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात व त्याचे महत्त्व काय ते थोडक्यात जाणून घेऊ. 

महालय याचे अपभ्रष्ट रूप महाळ असे होते. महालयाचा काल भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळ दीड ते पावणे दोन महिन्यांचा असतो. महालय हादेखील श्राद्धविधीच आहे. नेहमीचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो. म्हणजेच दुसऱ्या भाषेत प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे ठराविक पार्वणास (ठराविक व्यक्तीस) उद्देशून असते तर महालय सर्व पार्वणांना (दिवंगत नातेवाईक) उद्देशून असतो. 

श्राद्धकर्त्याने आपल्याजवळ एका जाड पुठ्ठ्यावर पावर्णांची यादी लिहून ती आपल्या देव्हाऱ्यात ठेवावी. वास्तविक ब्रह्मकर्मातील पितृतर्पणात या यादीतील सर्व पार्वणांचा उच्चार दररोज करावा लागत असल्यामुळे पूर्वी अशी यादी लिहून ठेवण्याची प्रथा नव्हती. हल्ली पंचमहायज्ञाचा लोप होत असल्यामुळे अशा यादीची गरज भासते. यामध्ये पितृत्रयी (वडील, आजोबा, पणजोबा), मातृत्रयी (आई, आजी, पणजी), मातामहत्रयी (आईचे वडील, आजोबा, पणजोबा) अशा मुख्य तीन त्रयी आहेत. ज्यांची पत्नी जिवंत नसेल त्या पार्वणांचा सपत्नीक म्हणून उच्चार करावा. 

याखेरीज पत्नी, पुत्रादिक, चुलते, मामा, भाऊ, आत्या, मावशी, बहीण, सासरे इ. पार्वणे आहेत. त्या त्या पावर्णांची पत्नी हयात नसेल तर सपत्नीक व पती हयात नसेल तर सभर्तृका असा नामोच्चार करावा. 

थोडक्यात आपण दरवर्षी ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्राद्धविधी करतो, त्याला महालय म्हणतात आणि ज्यांच्या नावे करतो त्यांना पावर्ण म्हणतात. सद्यस्थितीत लोक वेळे अभावी आणि श्राद्धतिथी माहित नसल्यास किंवा लक्षात नसल्यास सकल दिवंगत व्यक्तींचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला महालय करून मोकळे होतात. या सर्वात विधींइतकेच महत्त्व श्रद्धेला आहे. कारण हा केवळ उपचार नाही, तर दिवंगत व्यक्तींप्रती आदर, आत्मियता आणि आपुलकी दर्शवणारा भाव आहे. श्रद्धा असेल तरच श्राद्ध!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष