शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Pitru Paksha 2022: ऐन पितृपक्षात कावळे तुमच्या दारावर येऊन काव काव करत असतील, तर हे आहेत शुभ संकेत शुभ घटनांचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:55 IST

Pitru Paksha 2022: रोज दिसणारा कावळा पितृपक्षात समूहाने दर्शन देतो, तेव्हा काय घडू शकते ते जाणून घ्या!

सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रोज येणारे कावळे नेमके नैवेद्य ठेवल्यावर गायब होतात अशी अनेकांची तक्रार असते. परंतु तुमच्या बाबतीत विरुद्ध गोष्ट घडत असेल तर पितृपक्षात कावळ्यांचे दर्शन तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत, असे तुम्ही समजू शकता. 

आपल्याला कावळ्याची काव काव कटकट वाटते, पण संत ज्ञानेश्वर त्यातूनही शुभ संकेत शोधत म्हणतात, 'पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' यावरून ज्योतिष शास्त्र सुद्धा कावळ्याच्या बोलण्याचा संबंध शुभ-अशुभाशी कसा जोडला गेला ते सांगत आहे. 

शुभ-अशुभ चिन्हांचा आपल्या जीवनावर सकारात्मक-नकारात्मक प्रभाव पडत असतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट संकेत दर्शवतात. हे शकुन शतकानुशतके प्रचलित आहेत. आज आपण अशा पक्ष्याशी संबंधित शकुन आणि अपशकुनाबद्दल जाणून घेणार आहोत, जो सर्वत्र आढळतो. हा पक्षी आहे कावळा. कावळ्याशी संबंधित असलेल्या चांगल्या आणि वाईट लक्षणांबद्दल जाणून घेऊ. 

कावळ्याशी संबंधित ही लक्षणे धनवृद्धीची चिन्हे दर्शवतात 

>> जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठूनतरी खूप पैसा मिळणार आहे. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते.

>> त्याचबरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळ्याची दीर्घकाळ काव काव शुभ मानली जाते. हे घडणे एखाद्या पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण आहे, तसेच हा कार्यक्रम मान-सन्मान आणि पैसा मिळण्याचेही लक्षण आहे.

>> तुम्ही काम करत असताना एखादा कावळा काव काव करून लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचे लक्षण आहे.

>> आपल्या नेहमीच्या वाटेवर कावळे पाणी पिताना दिसले तर ते धनलाभाचे स्पष्ट लक्षण आहे.

या शुभ लक्षणांबरोबर काही अशुभ संकेतही मिळतात, ते पुढीलप्रमाणे - 

>> जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर कावळा बसला तर ते तिच्या कुटुंबावर संकट दर्शवते. 

>> बाहेर जाताना एखाद्या रुक्ष झाडावर गिधाड बसलेले दिसले तर तेही अशुभ लक्षण आहे. तिथून मार्ग बदला. 

>> घराच्या छतावर गरुड बसलेले दिसणे हे देखील संकटाचे लक्षण आहे.

>> जर एकाच वेळी भरपूर कावळे कोकलत असतील तर कुटुंब प्रमुखाची तब्येत बिघडू शकते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष