शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Pitru Paksha 2021 : धर्मशास्त्रानुसार श्राद्धविधी करण्याचे फायदे, तसेच तिथीनुसार मिळणारे फळ जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:17 IST

Pitru Paksha 2021 : पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असे नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मुख्यतिथीला, सहज प्राप्त गोष्टींतून श्राद्ध करता येते.

मनुष्यमात्रावर देव, ऋषि, पितृ यांची अशी तीन ऋणे असतात. यापैकी श्राद्ध करून आपण पितृऋण फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आपल्याला आयुरारोग्याच्या आणि सुख सौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणातून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ जीवन जगलो असा अर्थ होतो.

Pitru Paksha 2021 : श्राद्ध विधीची सुरुवात सर्वप्रथम कोणी आणि केव्हा केली, ते जाणून घ्या!

पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असे नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मुख्यतिथीला, सर्वात सहज प्राप्त होणाऱ्या जल, तीळ, तांंदूळ, कुश आणि फुले यांनी श्राद्ध करता येते. एवढे केल्याने आपल्यावरचा पितृऋणभार हलका होतो. यासाठी अनादि कालापासून चालत आलेला हा श्राद्धविधी आहे. श्राद्ध केल्याने कोणती फलप्राप्ती होते, याविषयी स्मृतिचंद्रिकेत एक श्लोक आहे -

आयु: पुत्रान् यश: स्वर्ग कीर्तिं पुष्टिं बलं श्रिय:पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात पितृपूजनात् ।।

आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने, म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात. म्हणजे पितरांच्या संतुष्टतेने श्राद्धकर्त्याचा विकास होतो. त्यातही श्राद्धविधीचे तिथीनुसार मिळणारे फळ धर्मशास्त्रात दिले आहे. ते पुढीलप्रमाणे-

प्रतिपदा - उत्तम पुत्र, पशु वगैरेची प्राप्तीद्वितीया - कन्या, संपत्तीतृतीया - अश्वप्राप्ती (आजच्या गाळात यशाची घोडदौड असा अर्थ घेता येईल)चतुर्थी - पशुधन, खाजगी वाहन, सुबत्तापंचमी - मुलांचे यशषष्ठी - तेजस्वी संतानसप्तमी - शेती, जमीनीची प्राप्ती, लाभअष्टमी - व्यापारात लाभनवमी - नोकरी उद्योगात भरभराटदशमी - सुबत्ता, वैभवएकादशी - ऐहिक सुखाचा लाभद्वादशी - सुवर्णलाभत्रयोदशी - पद, प्रतिष्ठाचतुर्दशी - सर्वसामान्य समाधानी जीवनअमावस्या - सर्व इच्छांची पूर्ती

Pitru Paksha 2021 : श्राद्धाचा स्वयंपाक आदर्श स्वयंपाक का मानला जातो, त्यातील पदार्थांचा क्रम कसा असावा ते जाणून घ्या!

चतुर्दशी तिथी वगळता दशमीपासूनच्या तिथी श्राद्धकर्मास प्रशस्त मानल्या आहेत. या सर्व तिथी वद्य पक्षातील असून पक्षपंधरवड्यात विशेष फळ देणाऱ्या आहेत. वरील लाभांची यादी वाचली की लक्षात येईल, एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पितरांना सद्गती देणारी नाही, तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारी आहे.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष