शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Pitru Paksha 2021 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करणे शक्य नाही? मग धर्मशास्त्राने दिलेले पर्याय वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 11:22 IST

Pitru Paksha 2021 : एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रूपाने धर्माने आपल्याला प्राप्त करून दिली आहे. 

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावस्येला करण्याची प्रथा आहे. सर्व पितरांचे एकत्रितपणे श्राद्ध अमावस्येला केले जाऊ लागल्याने या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते. 

एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रूपाने धर्माने आपल्याला प्राप्त करून दिली आहे. 

ज्यांना विविध सांसारिक अडचनींमुळे पितृपक्षातही श्राद्धकर्म यथाविधी करणे शक्य होत नाही, त्यांनी श्राद्धतिथीच्या दिवशी किंवा तिथी लक्षात नसल्यास सर्वपित्री अमावस्येला एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी द्यावी. एखाद्या वाचनालयाला ग्रंथ भेट द्यावेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे. भुकेलेल्यांना अन्न द्यावे. अथवा एक दिवसाचा, एक महिन्याचा, एक वर्षाचा शिधा अर्थात कोरडे धान्य दान करावे. गरजेनुसार वस्त्रदान करावे. हे सर्व करताना पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना करावी. 

शहरी भागात लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने ते या मार्गांचा अवलंब करताना आढळतात. या गोष्टीदेखील धर्मशास्त्राला जोडून आहेत. एवढेच काय, तर दान करण्याची आपली क्षमता नसेल, श्राद्धविधीचा खर्च परवडत नसेल, तर मोकळ्या मैदानात किंवा गच्चीत जाऊन आपल्यासाठी रांधलेल्या स्वयंपाकाचा कावळ्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यांचे मनोभावे स्मरण करून, दोन्ही हात वर करून आपली अमर्थता पितरांसमोर व्यक्त करावी. ते मोठ्या मनाने आपली सेवा मान्य करून आपल्याला शुभाशिर्वाद देतात, असेही धर्मशास्त्रात म्हटले आहे. 

तात्पर्य, आपल्या धर्मात सर्व बाबींचा किती सखोल अभ्यास केला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर साधे सोपे पर्याय दिले आहेत, यावरून धर्माची विशालता लक्षात येते. त्याचाच लाभ घेऊन आपणही कर्तव्याला जागुया आणि धर्माचरण करूया.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष