शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोरपिसाचे अंतरंग खुलवतील तुमचे वास्तुरंग : वापरून बघा या सोप्या वास्तूटिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 08:00 IST

मोरपीस आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद घेऊन येते, म्हणून वास्तूशास्त्रात त्याला अतिशय मानाचे स्थान आहे.

आनंद झाला की आपल्याला मोरासारखे नाचावेसे वाटते. एखाद्याचा प्रेमळ स्पर्श मोरपीस फिरवल्याची सुखद अनुभूती देतो. आपल्या मनाचे अंतरंग मोरपंखाप्रमाणे रंगीत आणि आकर्षक असतात, एवढेच नाही तर उमलत्या वयात आपले आयुष्य मोरपिशी होत जाते. मोराशी आणि मोरपंखाशी आपले नाते अगदी फार पूर्वीचे आहे. मोराला पाहिले तरी प्रसन्न वाटते. त्यात तो पावसात आनंदाने पिसारा फुलवून नाचताना दिसला तर आनंदी आनंदच! त्याचे आकर्षण आपल्याला वाटते, तर ज्याने त्याला निर्माण केले त्या परमेश्वराला का वाटू नये? श्रीकृष्णाने तर त्याला आपल्या मुकुटात मानाचे स्थान दिले आहे. तसेच  माता सरस्वती, इंद्रदेव, कार्तिकेय आणि गणपती बाप्पालाही अतिशय प्रिय आहे. असे मोरपीस आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद घेऊन येते, म्हणून वास्तूशास्त्रात त्याला अतिशय मानाचे स्थान आहे. 

काही जण आपल्या पुस्तकात, वहीत किंवा भिंतीवर मोरपीस लावणे पसंत करतात. ही केवळ शोभेची वस्तू नाही, तर वास्तू दोष दूर करणारी वस्तू आहे. वास्तुशात्र सांगते -

>>आठ मोरपिसे पांढऱ्या धाग्यात गुंडाळून 'ओम नमो सोमाय नमः' हा मंत्र म्हणून बेडरूमच्या भिंतीवर टांगून ठेवा. यामुळे दाम्पत्य जीवनात काही कुरबुरी असतील, तर त्या दूर होऊन नवरा बायको मध्ये प्रेम निर्माण होते. 

>>शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तीन मोरपिसे काळ्या धाग्यात गुंडाळून, सुपारीचे काही तुकडे घेऊन त्यावर पाणी शिंपडावे आणि 'ओम शनैश्वर नमः' हा मंत्र २१ वेळा जपावा. 

>>धन वृद्धीसाठी आपल्या तिजोरीत मोरपीस ठेवावे. 

>>घरातल्या मुख्य खोलीत अर्थात हॉलमध्ये मोराचे,  मोरपंखाचे किंवा कृष्णाचे चित्र लावावे. प्रसन्न वाटते. 

>>घराच्या मुख्य दरवाजावर मोरपीस लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. 

>>मोरपिसांचा उपयोग औषध निर्मितीसाठीदेखील केला जातो. ते सतत डोळ्यासमोर असले, तरी मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिल्याने स्वास्थ्य चांगले राहते. 

>>एकाग्रता वाढवण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो. मोरपीस पाहून मन शांत होते.