शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

Paush Maas 2024: रामललाच्या आगमनामुळे यंदाचा पौष मास ठरणार खास; वाचा पौषाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:50 IST

Paush Maas 2024: पौष महिन्यात शुभ कार्य होत नसली तरी आध्यात्मिक कार्यासाठी हा महिना अत्यंत पुण्यकारक मानला जातो; १२ जानेवारीपासून पौष मासारंभ!

यंदा १२ जानेवारीपासून पौष मास (Paush Maas 2024) सुरु होत असून ९ फेब्रुवारी रोजी तो संपणार आहे. या महिन्यात गृहप्रवेश, वास्तू शांत, साखरपुडा, विवाह, मुंज हे विधी करू नये असे म्हणतात. कारण अध्यात्मिक दृष्ट्या या महिन्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या मासाचे औचित्य साधून अयोध्येत रामललाची मुर्तीस्थापना देखील होणार आहे. 

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १२ वाजून २९ मिनिट व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिट व ३२ सेंकद हा ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त असल्याचे म्हटले आहे. ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लांचा अभिषेक करणार आहेत. मेष लग्न व अभिजित मुहुर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे. या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून याचवेळी सूर्य मध्यान्हावर येणार आहे. त्यावेळी सूर्य पूर्णतः तेजस्वी स्वरुपात राहणार आहे. या बरोबरच पौषाची महती जाणून घेऊ. 

तिळगुळाचा गोडवा आनि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष मास हा आसेतुहिमाचल अखिल भारतवर्षाला हवाहवासा वाटतो. तो विशेषत्वाने त्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणामुळे! या मासाची अधिक माहिती आणि महती जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांच्या लेखणीतून. 

हा एक महत्त्वाचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला पूर्वापार `भाकडमास' म्हटले जाते. या मासातील पौर्णिमेच्या आधी अथवा नंतर पुष्प नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'पौष' हे नाव मिळाले. पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे हे नक्षत्र विरक्ती वाढवणारे आहे. `गुरु-पुष्य' योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे. या योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, असे असले तरी पुष्य नक्षत्र विवाहासाठी योग्य नसल्याचे मुहुर्तशास्त्राने मत व्यक्त केले आहे.त्याही पलीकडे भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहसाठीच नव्हे, तर इतर शुभकार्यासाठी व्यर्ज मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशूंमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. 

पौष पौर्णिमेला 'राका' हे विशेष नाव आहे. कविवर्य यशवंत यांनी 'संक्रांतीचा दिवस आठवतो का तुला? 'त्वा जेधवा फुलविलीस मम भाग्य राका' असा या पौर्णिमेचा उल्लेख करून तिला रमणीय केले आहे. 'तैष' आणि `सहस्य' अशी याची आणखी दोन नावे आहेत. ऋतुंमधील हेमंत ऋतुचा हा दुसरा मास! या महिन्यात उत्तरायण असते. याव्यतिरिक्त माघस्नान आणि शाकंभरी पौर्णिमा या दोन्ही महत्त्वाच्या तिथीविशेषांमुळे पौष मास आपले महत्त्व राखून ठेवतो. यातही मकरसंक्रांतीचा काल हा दानधर्म, व्रते, श्राद्धकर्मे, तीर्थस्नान आदी धर्मकार्यासाठी प्रशस्त असल्याचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेसारखेच मकरसंक्रांतीला केल्या जाणाऱ्या धर्मकृत्यांना त्यातही दानकर्मांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.  

मकरसंक्रांतीच्या दिवशी बंगाल प्रांतात एक लोकोत्सव केला जातो. या दिवशी स्त्रिया आपापल्या घरच्या धान्याच्या कणग्यांना गवताची पेंढी बांधतात. ही पेंढी बांधत असताना त्या बावन्नपौटी हा शब्द सतत उच्चारत असतात. पौटी म्हणजे पटीने. कणगीतील धान्य बावन्न पटीने वाढो, असा त्याचा अर्थ! पुढील वर्षाच्या धनधान्यसमृद्धीसाठी हा विधी केला जातो. तर आंध्र प्रदेशातील 'गमल्ल' जातीमध्ये संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरी पूर्वजांची पूजा केली जाते. 

असे असले, तरी पौष महिन्यात मकरसंक्रांतीच्या सणामुळे इतर व्रते महत्त्वाची नसल्यामुळे अनेकांना ती माहितदेखील नाहीत. गुजरातमध्ये पौष पौर्णिमेला लहान बहिणी आपल्या भावासाठी दिवसभराचा उपास करतात. रात्री चंद्रपूजा करून तो उपास सोडतात, म्हणून या पौर्णिमेला `भगिनी पौर्णिमा' म्हणातात. तर आदिवासींच्या मुंडा जमातीत पौष पौर्णिमेला खळ्यातून धान्य आणून ते घरच्या कोटारात भरतात. त्या धान्योत्सवाला `मगे परब' असे म्हणतात. परब म्हणजे पूर्व! तसेच परब म्हणजे पर्व. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील कर्तापुरुष उपवास करतो. पौर्णिमेला स्नान करून तो प्रथम पितरांची पूजा करतो. नंतर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाटी त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. एवढे झाल्यावर घरातील सर्व मंडळी नवीन तांदळाचे पोहे, गूळ, भात, भाकरी अशा पदार्थांचे सहभोजन करतात. 

हे ही वाचा : पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी