शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Paush Amavasya 2024: पौष अमावस्येला करा पितृपूजन आणि स्वागत करा मंगलमयी माघाचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:11 IST

Paush Amavasya 2024: पौषात खोळंबलेली मंगल कार्य माघ मासात पुनश्च सुरु होणार, त्यापूर्वी ९ फेब्रुवारी पौष अमावस्येला पितृ तर्पण करायला विसरू नका!

शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जाणारा, परंतु धर्म कार्यासाठी पुण्यदायी मानला जाणारा पौष मास संपत आला. ९ फेब्रुवारी रोजी पौष अमावस्या आहे. ही अमावस्या पितरांचे स्मरण, पूजन या अर्थाने महत्त्वाची मानली जाते. ज्यांच्यामुळे आपले अस्तित्त्व, ओळख आहे, त्या पितरांप्रती कृतज्ञता मानण्याची ही चांगली संधी गमवू नये. त्यासाठी फार सोपस्कार करायचे नसून थोडासा नैवेद्य, दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून हा विधी पार पाडायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पौष मासातील पौर्णिमेप्रमाणेच अमावस्यादेखील धर्मकार्यासाठी पर्वणी मानली जाते. इतर अमावस्यांप्रमाणेच ह्या अमावस्येलाही पितृश्राद्ध, तर्पणादी विधी आवर्जून करावेत. या दिवशी केलेले पितृतर्पण, दान हे सारे थेट पितरलोकातील आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी पूर्वापार श्रद्धा आहे.

वास्तविक सर्वच अमावस्या या पितृकार्यासाठी योग्य मानल्या जातात. आपल्या धर्मशास्त्रानुसार पितृतर्पण रोज करावे, असाही प्रघात आहे. काही मंडळी तो इमानेइतबारे पाळतातही. ज्यांना नित्यदिनी अथवा प्रत्येक अमावस्येला हे पितृश्राद्ध, तर्पण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान पौषी अमावस्येला ते न चुकता, आवर्जून करावे. पितरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी सहसा चुकवू नये.

या अमावस्येला बुकल अमावस्या असे विशेष नाव आहे. या अमावस्येला दुधात तांदूळ घालून केलेली खीर पितरांसाठी वाढून ठेवावी. त्यामुळे पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे.

आपल्या वंशजांबद्दल पितरांना आस्था, प्रेम असणारच. त्यात आपल्या माणसांनी, मुलाबाळांनी आपली आठवण ठेवून खास खीर करून ती आपल्याला अर्पण केली, हे बघून पितर प्रसन्न होणार हे उघडच आहे. आपल्यालाही एक वेगळे, शब्दात सांगता न येणारे समाधान या विधीमुळे होते. यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाने शक्यतो हा बकुल अमावस्येचा गंभीर तितकाच गोड विधी करण्यास चुकू नये.

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३