शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

धैर्य हा मानवाचा दागिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:01 IST

ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो. धैर्याने तो आपल्यावर येणाऱ्या संकटांना हसत-खेळत सामोरे जातो. तो मनुष्य यशाची प्रदीर्घ प्रतीक्षा करतो व साधना करत राहातो. कुठल्याही प्रसंगी तो आपले धैर्य सोडत नाही. आपल्या कार्यापासून जराही विचलित होत नाही. कठीणातल्या कठीण प्रसंगी आपले धैर्य टिकवून ठेवतो. कारण त्याच्यातला आत्मविश्वास कायम असतो. ज्याचा आत्मविश्वास बळकट आहे तो आपल्या यशस्वी साम्राज्याची गुढी उभारतो. आत्मविश्वासाने पराजयाचे विजयात रूपांतर करतो. नि:संदेहपणे जगतो. आत्मविश्वासाच्या बळावर मनुष्य महान कार्य करतो. तो कधीच आपला आत्मविश्वास गमावत नाही.आपला विवेकरूपी तोल कधी ढळू देत नाही. जीवनात मान-अपमान, धर्म-अधर्म, जीवन-मरण, लाभ-हानी या सर्वांना तो ओळखून असतो. त्या मनुष्याला त्याची परिपूर्ण जाणीव असते. त्याच्या जीवनात कुटिल राजकारण नसते. आपल्याकडून कुठलेही वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता घेतो. त्याच्या प्रत्येक कर्मात सरलता, सुबोधता आढळते. खोटेपणा, कृत्रिमता त्याच्या कार्यात नसते. तो मनुष्य साधनाशील असतो. जीवनमूल्यांचा प्रसार-प्रचार करतो. धर्माची प्रबलता वाढवतो. समाज, राष्ट्र घडविण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. सदाचार, श्रेष्ठाचार त्याच्या अंगी बाळगतो. भ्रष्टाचार शब्द त्याच्या मनाच्या नोंदवहीतसुद्धा सापडत नाही. तो मनुष्य नेहमी संयम-सदाचार याचा परिपाठ लोकांना सांगतो किंवा आपल्या आचरणातून दाखवतो. तो मनुष्य धैर्य-विवेक व आत्मविश्वासाच्या समन्वयातून आकाशात उडण्याचा प्रयत्न करेल किंवा उडेलही. म्हणून म्हणतो माणसाजवळ धैर्य-विवेक व आत्मविश्वास नसेल तर तो मनुष्य तरुण असूनही वृद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक