शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: ‘असे’ करा व्रत, स्तोत्रांचे पठण; पाहा, पूजाविधी अन् महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:59 IST

Parivartini Ekadashi 2024: परिवर्तिनी एकादशीच्या व्रताची सांगता कशी करावी? एकादशीचा शुभ मुहूर्त आणि काही मान्यता जाणून घ्या...

Parivartini Ekadashi 2024: भाद्रपद महिना सुरू आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही दिवसांनी गणेशोत्सवाची सांगता होत आहे. यातच भाद्रपद शुद्ध एकादशीला परिवर्तिनी एकादशी व्रत आचरले जात आहे. मराठी वर्षात प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत केले जाते. एकादशीचे व्रत श्रीविष्णूंना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी केलेले श्रीहरि विष्णूंचे पूजन अत्यंत पुण्यफल लाभदायी मानले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला कोणते शुभ योग जुळून आले आहेत? व्रताचरण कसे करावे? जाणून घेऊया...

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही पद्मा एकादशी या नावानेही ओळखली जाते. या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असे म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. ज्यांना उपास करणे शक्य नसते, साधा सात्त्विक आहार घ्यावा, असे सांगितले जाते. 

परिवर्तिनी एकादशीचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग

परिवर्तिनी एकादशी शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रौ १० वाजून ३१ मिनिटांनी सुरु होत असून, शनिवार, १४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रौ ८ वाजून ४२ मिनिटांनी समाप्त होईल. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे परिवर्तिनी एकादशीचे व्रत १४ सप्टेंबर २०२४ रोजी आचरावे, असे सांगितले जात आहे. या दिवशी रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग असे अनेक शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. 

परिवर्तिनी एकादशीचे व्रतपूजन करावयाचा विधी

सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचे आचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर श्रवण करावे. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. 

परिवर्तिनी एकादशी व्रतसंकल्पाची सांगता करावयाचा विधी

एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणताही संशय ठेऊ नये, असे म्हटले जाते. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. श्रीविष्णूंची मनोभावे पंचोपचार पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रताचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी, असे सांगितले जाते. 

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक