शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Parivartani Ekadashi 2024: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी केले जाते परिवर्तनी एकादशीचे व्रत; वाचा व्रतविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 10:06 IST

Parivartani Ekadashi 2024: १४ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे, हे व्रत केले असता इच्छित मनोकामनांची पूर्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे. 

प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्व सण, वार, उत्सव, व्रत, वैकल्ये ही निसर्गाशी निगडित आहेत. १४ सप्टेंबर रोजी शनिवारी परिवर्तिनी एकादशी (Parivartani Ekadashi 2024) आहे. ही एकादशी पद्मा एकादशी या नावेही ओळखली जाते. या एकादशीमागे काय कथा आहे ती जाणून घेऊ आणि तिचे व्रतमहात्म्य समजून घेऊ.

या एकादशीची एक विशेष कथा आहे. ती अशी- 

फार पूर्वी सूर्यवंशीय राजा मांधाना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले. त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला. त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले. परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले. राजा आणि प्रजा सुखी झाली. 

असे परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आहे. हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रात:काळी शुचिर्भूत होऊन भगवान श्रीविष्णूंची यथासांग पूजा करावी. पूर्ण दिवसाचा उपास करून रात्री नामसंकीर्तन करीत जागरण करावे. द्वादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपास सोडावा.

या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असेही म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.  या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते. 

विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात, ते ही एकादशीदेखील करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच साधा सात्त्विक आहार घ्यावा. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करावे. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३