शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Papmochani Ekadashi 2025: 'हे' दहा लाभ मिळवण्यासाठी बुधवारी पापमोचनी एकादशीचे व्रत कराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:08 IST

Papmochani Ekadashi 2025: २६ एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे, नवीन हिंदू वर्षाची सुरुवात करताना आजवर झालेल्या पापातून मुक्त होण्यासाठी हे व्रत कराच!

हिंदू वर्षातील शेवटच्या महिन्यातील शेवटची एकादशी अशी फाल्गुन मासातील पापमोचनी एकादशीची ओळख आहे. भाविक एकादशीचे व्रत आवर्जून करतात. ही तिथी भगवान महाविष्णूंची प्रिय तिथी असल्यामुळे एकादशी व्रत केले असता त्यांची कृपादृष्टी लाभते. या व्रताचे दिवशी दोन्ही वेळेस उपास करून केवळ फलाहार करणे अपेक्षित असते. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा जप करून दुसरे दिवशी अन्न ग्रहण करून व्रत पूर्ण करायचे असते. 

Papmochani Ekadashi 2025: हिंदू नवे वर्ष सुरू होण्याआधी सर्व पापांचे निराकरण करणारी पापमोचनी एकादशी!

यंदा बुधवारी २६ एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी (Papmochani Ekadashi 2025) आहे. या एकादशीच्या नावावरूनच लक्षात येते की पापक्षालन करण्याच्या हेतून हे व्रत केले जाते. दर वेळी आपण जाणून बुझून पाप तसेच गैरवर्तन करतो असे नाही, परंतु आपल्या हातून, बोलण्यातून, देहबोलीतून कळत नकळत पाप घडतात. त्याचे क्षालन होण्याहेतूने या व्रताचे आयोजन केले आहे. 

एकादशी कोणतीही असो, त्याचे भरघोस फायदे मिळतात. त्यातही ती पापमोचनी एकादशी असेल तर अधिकाधिक फायदे पदरात पाडून घेता येतील. हे फायदे पुढीलप्रमाणे-

>> पापमोचनी एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. यानिमित्ताने जाणते अजाणतेपणी झालेल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी. 

>> पापांचा नाश झाल्यावर सुख समृद्धीची द्वारे आपोआप खुली होतात.

>> हे व्रत केले असता वाजपेय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यश मिळते. 

>> हे व्रत केले असता मोक्ष प्राप्ती होते. 

>> भविष्यात आपल्या हातून पाप घडू नये, याची जाणिव करून देणारी ही एकादशी आहे. 

>>या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहून त्यांची पूजा केल्यास कृपादृष्टी प्राप्त होते. ..

>> या दिवशी नवग्रहांची पूजा केली असता, कुंडलीतील ग्रहांचा प्रकोप सौम्य होतो. 

>>पापमोचनी एकादशी व्रत केल्याने मनातील पापांचा निचरा होऊन मन निर्मळ बनते. 

>> कितीही अडचणी आल्या, तरी हे व्रत चुकवू नये. हे व्रत भक्तिभावे केले असता, उचित फलप्राप्त होते. 

>> या व्रतामुळे हर तऱ्हेच्या पापांपासून मुक्ती मिळते. 

Shani Amavasya 2025: २००० वर्षांनी जुळून येतोय दुर्लभ संयोग; 'हा' छोटासा उपाय तुमचे जीवन बदलू शकतो!

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी