शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Papmochani Ekadashi 2024: यंदाच्या हिंदू वर्षातील शेवटची एकादशी; अशी करा पूर्वतयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 07:00 IST

Papmochani Ekadashi 2024: हिंदू वर्षाला निरोप देताना गतकाळातील पाप क्षालन होऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सज्ज व्हावे म्हणून या एकादशीची तयारी अवश्य करा. 

प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात. पापमोचनी या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते. यंदा ५ एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे. त्यानिमित्ताने  दिलेले उपाय करा आणि पापमुक्त होण्याचा प्रयत्न करा. 

पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात. सध्या फाल्गुन मास सुरु असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे. जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरु होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असेही या एकादशीचे प्रयोजन असेल. त्यादृष्टीने आपणही या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेऊ. 

एकादशी कोणतीही असो, त्यादिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यानुसार एकादशीचा उपास करून, सकाळी अंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करणे अपेक्षित असते. यादिवशी भगवान विष्णूंना दुधाचा, पाण्याचा, पंचामृताचा किंवा एक हजार तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येतो. अभिषेकाच्या वेळी 'ओम नमो भागवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणावा, ज्यामुळे विष्णुकृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होते. 

पापमोचनी एकादशीचा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी फाल्गुनमहिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार, ४ एप्रिल रोजी दुपारी ४:१६ मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ५ एप्रिल रोजी दुपारी १:२८ मिनिटांनी संपेल. उदयतिथी लक्षात घेऊन ५ एप्रिल रोजीच हे व्रत केले जाईल. 

झेंडूच्या फुलांचा उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करावे. यासोबतच देवघर, स्वयंपाकघर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूचे फूल वाहावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील. तसेच, तुमच्या घरातून आर्थिक समस्या कमी होतील. तसेच ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ चिंतेत होता ते कामही पूर्ण होईल.

नऊ वातींचा दिवा लावा

पापमोचनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत पूजा करावी. तसेच नऊ वातींचा दिवा लावावा, जेणेकरून आपल्यात पाप संपुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल. यानंतर देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्री हरी स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिष