शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

Pabodhini Ekadashi 2023: प्रबोधिनी एकादशी विठुरायाला झोपेतून उठवणारी नाही तर मानवाला जागं करणारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:33 IST

Prabodhini Ekadashi 2023: २३ नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशी आहे, तिलाच आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो; तिचा गर्भितार्थ प. पु. आठवले शास्त्री यांच्या चिंतनातून जाणून घेऊ!

कार्तिक शद्ध एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात झोपलेल्या भगवंताला चार महिन्यांच्या दीर्घ झोपेतून उठवण्याचा दिवस. प्रबोधन म्हणजे जागवणे-उठवणे म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे नाव देण्यात आले आहे. आपल्यातील राम जागृत व्हावा, आपल्याला आपल्या जबाबदारीचे भान यावे, यासाठी लक्षणात्मकरित्या आपल्या ऋषींनी भगवंताला झोपवले. खरे पाहता, भगवंताला जागवणे म्हणजे स्वत:ला जागवणे. 

झोपलेल्याला उठवणारी, बसलेल्याला उभा करणारी, उभा असेल त्याला चालायला लावणारी आणि चालत असेल, त्याला धावायला लावणारी ही जीवंत व प्रेरणादायी वैदिक संस्कृती आहे. मानवाचे जीवन कमल पत्रावर असलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. त्याला व्यर्थ प्रमादामध्ये उधळून न टाकता माणसाने जागृत राहून त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. कोंबड्याच्या आरवण्याने किंवा सूर्याच्या उगवण्याने सकाळ होत नाही, तर माणसाच्या उठण्याने सकाळ होते.

ज्ञान हेच सद्गुण आहे. कोणीही माणूस जाणूनबुजून वाईट बनत नाही. गरज आहे ती केवळ सत्य समजावून घेण्याची. आज प्रत्येक माणूस झोपलेला दिसतो. मात्र जागत असल्याचा देखावा करण्यात तो अतिशय कुशल बनलेला आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले,  तर माणूस दांभिक बनला आहे. आळस, अज्ञान व अंधार यांच्या घोर निद्रेत असलेल्या मानवाला जागवणारी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी.

या दिवशी भगवंताचे तुळशीशी लग्न लावण्याची परंपरा आहे. भगवान चार महिने झोपल्यानंतर आपण जे काही उलट सुलट केले असेल, त्याचा अतिशय कडक हिशोब त्याने आपणाकडून मागू नये, म्हणून त्याचे ध्यान दुसरीकडे वळवण्यासाठी मानव भगवंताचे  लग्न लावून देतो, अशी विनोदी कल्पना कोणाच्या मनात येऊ शकते. भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि `तुलसी माता' या नात्याने तिचे पूजन करते. समाजातून रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो, तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू . पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे. या गोष्टीचे आपल्याला भान यावे, म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा मंडप उसाच्या झाडांनी बनवण्यात येतो. उसासारखे रसमय जीवन असेल म्हणजे तारुण्यात प्रभुकार्य करता आले, तरच प्रभुच्या मिलनाची शक्यता राहू शकते. 

दिवाळीच्या दिवशी अगणित दिवे लावतात, तसे भगवंताच्या विवाहाच्या आनंदात या दिवशीही लोक असंख्य दिवे लावतात. देवासाठी लावलेल्या या दिव्यामुळे प्रबोधिनी एकादशी, `देवदिवाळी' म्हणून प्रसिद्ध आहे.