शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आपली कुंडलिनी कशी आहे तर हनुमंतासारखी; असे वर्णन का आढळते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 18:37 IST

स्वतःचा उत्कर्ष साधायचा असेल तर कुंडलिनी जागृत करायला हवी असे म्हणतात, हनुमंतांनी ते कसे केले? वाचा. 

ज्याप्रमाणे सप्त स्वर्ग व सप्त लोक पिंडात आहेत त्याप्रमाणे ब्रह्माण्डाला आधारभूत असणारी शक्ती मानवी शरीरातही आहे. तिलाच कुंडलिनी अशी संज्ञा आहे. संहिताभागात तिला आत्म्याची शक्ती, तर उपनिषदात देवात्मशक्ती असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात लिहिले आहे, 

ब्रह्मांडी तेचि पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे

आपल्या देहाची म्हणजे पिंडाची रचना ब्रह्मांडाप्रमाणेच आहे. अशी आपली अध्यात्मिक धारणा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हण त्यावरूनच पडली आहे. ब्रह्माण्डातील सर्व चौदा भुवने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात आहेत. संध्यादि कर्माच्या पूर्वी केल्या जाणाऱ्या न्यासाच्या जर सूक्ष्म अर्थ बघितला, तर त्या न्यासाची योजना  ब्रह्मांडी ते पिंडी या तत्त्वावर केली आहे, असे लक्षात येईल. 

हनुमानाने जन्मतःच सूर्यबिंबाचा ग्रास करण्यासाठी केलेले उड्डाण आणि कुंडलिनी शक्तीचे जागृत होताच ब्रह्मरंध्राच्या दिशेने होणारे उड्डाण या दोहोंवरून असा निष्कर्ष सहज येतो कि हनुमानाची जन्मकथा हे एक रूपक असून, कुंडलिनी जागृतीचे ते वर्णन आहे. कुंडलिनीच्या ब्रह्मरंध्रापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की, ती जेव्हा हृदय स्थानाच्या पुढे जाते, तेव्हा वायूने सुवर्णरुपी वस्त्राचा त्याग करावा व तो अदृश्य व्हावा, त्याप्रमाणे कुंडलिनी अदृश्य होते, वायुरूप धारण करते. हनुमानाचे वायुरूप तेच आहे. मूलाधारातून सहस्रार गाठणे हीच हनुमानाची जन्मकाळाची अलौकिक उडी आहे. या उल्लेखांवरून हनुमान हे कुंडलिनीचेच प्रतीक असल्याचे सिद्ध होते. त्याला पुष्टी देणारी आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे. 

त्या हनुमानाचा आदर्श ठेवून आपणही आपली कुंडलिनी जागृत करण्याचा आणि सत्राणें उड्डाणे घेण्याचा प्रयत्न करूया.