शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'घरात अभद्र बोलू नये' असे आपले पूर्वज सांगत असत, त्यामागे होती वास्तुशास्त्राशी संबंधित 'ही' कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:37 IST

शास्त्र असतं ते, असं म्हणून सोडून न देता ते शास्त्र समजून घेतलं पाहिजे

निसर्गात उमटलेला ध्वनि जसा प्रतिध्वनी होऊन आपल्याला परत ऐकू येतो, त्यानुसार आपल्या वास्तुमध्ये उच्चारलेला शब्द प्रतिध्वनी होऊन आपल्यावर काम करतो. म्हणून वास्तूमध्ये बोलताना अतिशय सांभाळून बोला, कारण वास्तुपुरूष नेहमी तथास्तू म्हणत असतो, ही आपली पूर्वापार श्रद्धा आहे आणि तसे घडतेही. याबाबत वास्तुशास्त्रज्ञ काही उपाय सांगतात.

>> ज्या घरत सतत भांडणे होतात, नकारात्मक चर्चा होते, लोकांना नावे ठेवली जातात, त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात. अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत. 

>> सतत वाईट गोष्टी, उणिवा, अधुरी स्वप्न यांची चर्चा न करता सकारात्मक बोलत राहिले पाहिजे. जसे की, माझे सगळे चांगलेच होणार आहे, माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदणार आहे, माझ्या मुलांची प्रगती होणार आहे, आमचे दांपत्य जीवन आनंदात जाणार आहे, माझे आजार दूर होणार आहे, मी कर्जमुक्त होणार आहे, या सकारात्मक लहरींचा प्रभाव वास्तूवर होतो आणि या लहरी परिणामकारक ठरून घरातल्या सदस्यांना सकारात्मक ऊर्जा देतात.

>> घरात स्वामी मंत्र, रामरक्षा मंत्र, गायत्री मंत्र, गणेश मंत्र इ. मंत्रांचे, स्तोत्रांचे मोठ्याने पठण करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तूपुरुष आपल्याला सद्बुद्धी देऊन वाईट विचारांपासून दूर ठेवतो. तसेच बाजारात एक इलेक्ट्रॉनिक यंत्र मिळते. त्यावर मंत्रांचा अविरत जप सुरू असतो. ते यंत्र मंद आवाजात घरात लावून ठेवावे. आपल्याकडून नकळतपणे मंत्रजप होत राहतो आणि वाईट विचार दूर राहतात. 

>> कोणीही कितीही वाईट वागले तरी त्याचे वाईट चिंतू नका. ज्याला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते. परंतु दुसऱ्याचे वाईट चिंतून त्याच्याबद्दल अपशब्द काढला, तर वास्तू तथास्तू म्हणून त्या परिणामांना आधी आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून कोणाबद्दल कधीही वाईट बोलूच नका. 

>> ज्याप्रमाणे चेंडू एखाद्या भिंतीवर जोरात फेकून मारला, तर तो तितक्याच वेगाने आपटून मागे येतो, तीच बाब आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांच्या बाबतीत घडते. म्हणून सतत चांगलेच बोला. कधी काय घडेल, हे आपण सांगू शकत नाही. कधी कोणते शब्द शेवटचे ठरतील सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीभेला चांगले बोलण्याची सवय आणि वळण लावून घ्या. >> परदेशातील वास्तुशास्रज्ञांनीदेखील वास्तू तथास्तू संकल्पनेला दुजोरा दिला आहे. नकारात्मक बोललात तर नकारात्मक घडेल, सकारात्मक बोला सकारात्मक घडेल. म्हणून घरात वादविवाद टाळा, संवाद साधा, एकमेकांना समजून घ्या, घरात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा, वास्तूपुरुषाची कृपादृष्टी कायमस्वरूपी राहिल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र